#Varora• वरोऱ्यात शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेसचे चक्काजाम आंदोलन. • खासदार प्रतिभा धानोरकराचे नेतृत्वात शेतकऱ्यांचे

#Varora
• वरोऱ्यात शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेसचे चक्काजाम आंदोलन. 

• खासदार प्रतिभा धानोरकराचे नेतृत्वात  शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन.

वरोरा - ग्यानीवंत गेडाम 

शेतकरी व जनतेच्या न्याय हक्कासाठी आज वरोरा येथे असंख्य शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत नागपुर-चंद्रपुर महामार्गावर "चक्काजाम आंदोलन" करण्यात आले. अतिवृष्टी मुळे महाराष्ट्रातील बळीराजा संकटात आला आहे, कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत, पण तरीही महायुती सरकार मात्र फक्त मोठमोठ्या वल्गना करून रिकाम्या आश्वासनांची फसवी नाटकं करत आहे. निवडणुकीपूर्वी भाजपानं जाहीरनाम्यात केलेली "सातबारा कोरा... कोरा... कोरा..." ही घोषणा खोटी ठरली आहे व सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे. 

राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करा आणि  शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जाहीर करा. तसेच, चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना विशेष पॅकेज देऊन कापूस उत्पादकांना ₹१ लाख हेक्टरी, तर सोयाबीन उत्पादकांना ₹५० हजार हेक्टरी नुकसानभरपाई शासनाने द्यावी. अशी ठाम भूमिका या आंदोलनातून घेण्यात आली आहे. 

यावेळी चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  रितेश तिवारी, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष सोहेलभाई रजा, वरोरा तालुकाध्यक्ष  मिलिंद भोयर, भद्रावती तालुकाध्यक्ष प्रशांत काळे, वरोरा शहराध्यक्ष विलास टिपले, भद्रावती शहराध्यक्ष सूरज गावंडे, राजूभाऊ चिकटे, विशाल बदखळ, ऐश्वर्याताई खामनकर, संध्याताई पोडे, दिपालीताई माटे, सरीताताई सूर यांसह काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी, स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments