आदिवासी पारधी वस्तीच्या विकासासाठी 47 लाखांचा निधी मंजूर धर्मेंद्र शेरकुरे यांच्या प्रयत्नांना यश जिल्हाधिकारी व आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांचे शेरकुरे नी मानले आभार

आदिवासी पारधी वस्तीच्या विकासासाठी 47 लाखांचा निधी मंजूर                                           
धर्मेंद्र शेरकुरे यांच्या प्रयत्नांना यश 

जिल्हाधिकारी व आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांचे शेरकुरे नी मानले आभार 

ग्यानीवंत गेडाम 

वरोरा :- आदिवासी पारधी समाजाच्या वस्तीच्या विकासासाठी चंद्रपूर जिल्हा नियोजन समिती ने आदिवासी पारधी समाजाच्या वस्तींच्या विकास कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून अंदाजे 47 लाख रुपये च्या  विविध विकास कामांना  जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी प्रदान केली आहे.                 पारधी समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी निवेदनाच्या माध्यमातून आदिवासी पारधी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र शेरकुरे यांनी तत्कालीन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित  यांना भेटून निवेदन दिले होते.अप्पर आयुक्त नागपूर यांनी निवेदनाची दखल घेत आदिवासी विकास मंञ्याचे पञान्वये एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चंद्रपूर विकास राचेलवार व चिमुर प्रकल्प अधिकारी प्रवीण लाटकर यांनी धर्मेंद्र शेरकुरे  यांच्या समवेत चंद्रपूर आदिवासी प्रकल्प कार्यालयात जिल्ह्यातील पारधी बेड्यांची स्थिती व समस्या जाणून घेऊन येणाऱ्या पुढील वर्षात विविध विकास कामे यावर नियोजन करून जिल्हा नियोजन समिती मध्ये विविध विकास  कामांचा प्रस्ताव देऊन जिल्हा वार्षिक योजना 2025- 26 अंतर्गत अंदाजे साठ लाख रुपयांच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. यामध्ये वरोरा तालुक्यातील चिनोरा येथे  33 लाखाची कामे मंजूर केली असून यामध्ये गावातील अंतर्गत नाली बांधकाम  ,सिमेंट रोड बांधकाम  ,स्मशानभूमीपर्यंत डब्ल्यू बी एम रोड , गावातील रोड लगत पेव्हर ब्लॉक बसवणे, अशी कामे आहे तसेच कोरपणा तालुक्यातील रुपापेठ पारधी बेडा येथे दोन सिमेंट रोड बांधकामासाठी प्रतेकी सात लाख रुपये प्रमाणे दोन रोड 14 लाख रुपयांचा भरिव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे .जिल्हाधिकारी विनय गौंडा व आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांचे आभार आदिवासी पारधी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र शेरकुरे व पदाधिकार्यानी मानले आहे.

Post a Comment

0 Comments