लोकमान्य महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिन' संपन्न
ग्यानीवंत गेडाम
वरोरा - दि. २७ फरवरी २०२६ रोज शुक्रवारला लोकमान्य महाविद्यालयात 'मराठी भाषा गौरव दिन' आणि विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाकरिता अध्यक्ष म्हणून लोकमान्य महाविद्यालयाच्या प्राचार्य व मराठी विभाग प्रमुख डॉ. जयश्री शास्त्री उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून लोकमान्य महाविद्यालयाच्या मराठी विषयाच्या प्रा. डॉ. रजनीगंधा खिरटकर उपस्थित होत्या. ‘मराठी विज्ञान साहित्य' असा त्याच्या व्याख्यानाचा विषय होता.प्राचार्य डॉ. जयश्री शास्त्री यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून कुसुमाग्रजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली, सोबतच मुलींनी सरस्वती स्तवन व मराठी भाषा गौरव गीत गायले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. चेतना पवार तर प्रास्ताविक प्रा. अर्चना भोगेकर आणि आभार प्रा. मेघा लाकडे यांनी केले कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने करण्यात आला.
0 Comments