दैनिक जागर मराठी :ग्यानीवंत गेडाम (संपादक)
वरोरा - छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी श्री. छत्रपती क्रीडा मंडळ, पारोधी (ता.भद्रावती, जि.चंद्रपुर) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य कबड्डी सामन्यांचे उद्घाटन मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंगाधर बोढे , तर उद्घाटक म्हणून सचिन जिवतोडे उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रद्धा लकोटे , संदीप घरत, दीपक शेंबळकर, .चेतन भोगेकर,. रमेश शेंबळकर . कल्पना भोंगळे, शुभांगी घरत, स्वप्नील शेंबळकर , आकाश कामडे, . खुशाल शेंबळकर, अतुल खीरटकर, भाऊराव विरुटकर, सुमित गिरसावळे, मनीष शेंबळकर व उमेश विरुटकर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन सामन्याला प्रेक्षकांची मोठी गर्दी लाभली होती. परिसरातील विविध संघांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला असून, खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून प्रेक्षकांची मने जिंकली.
या कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ₹25,555, द्वितीय ₹18,888, तृतीय ₹11,111 व चतुर्थ ₹7,777 अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या उपक्रमामुळे तरुणांमध्ये क्रीडाप्रेम, संघभावना, शिस्त व आरोग्याची जाणीव वाढीस लागते, असे मत मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मनोज दादा आसुटकर यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. छत्रपती क्रीडा मंडळ, पारोधी तसेच गावकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments