१२ तासांत दुकानफोडीचा गुन्हा उघड****तीन आरोपी जेरबंद; ९७ हजारांचा मुद्देमाल जप्त**📡 *हिंदुस्तान न्यूज़ 24* ✍️ **रेखा चंडाले* 👉 *जिल्हा प्रतिनिधी चंद्रपुर**

**१२ तासांत दुकानफोडीचा गुन्हा उघड**
**तीन आरोपी जेरबंद; ९७ हजारांचा मुद्देमाल जप्त**
📡 *हिंदुस्तान न्यूज़ 24* 
✍️ **रेखा चंडाले* 
👉 *जिल्हा प्रतिनिधी चंद्रपुर** 

 शहरातील बामणी परिसरात घडलेल्या बंद हार्डवेअर दुकान फोडीच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या १२ तासांत छडा लावत स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावली. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून चोरीस गेलेला सुमारे ९७ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये देवांशू नरेंद्र धुर्वे (रा. महाराणा प्रताप वॉर्ड, बल्लारपूर), अफरोज खान फिरोज खान पठाण (रा. साईबाबा वॉर्ड, बल्लारपूर) व रोहित किसन धुंडेले (रा. फुलसिंग नाईक वॉर्ड, बल्लारपूर) यांचा समावेश आहे.

या प्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ५००/२६ अन्वये बीएनएस कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा नोंद होताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा बारकाईने अभ्यास करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

दरम्यान, मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी २३ एप्रिलच्या रात्री सापळा रचत आरोपींना अटक केली. चौकशीत आरोपींकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कांक्रेडवार, पोलीस हवालदार किशोर वैरागडे, पोलीस अंमलदार गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर व ऋषभ बारसिंगे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रेमशाह सयाम करीत आहेत.

Post a Comment

0 Comments