बल्लारपुरात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; चार जण ताब्यात
बल्लारपूर : महाराणा प्रताप वॉर्डातील एका घरासमोरील सार्वजनिक ठिकाणी पत्त्यांवर हार-जीतचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर बल्लारपूर पोलिसांनी धाड टाकून चार जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई २० ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आली.
पोलिस पथक गस्तीवर असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला. यावेळी काही जण घरासमोरील खुल्या अंगणात गोलाकार बसून पत्त्यांवर जुगार खेळताना आढळून आले.
पोलिसांनी कारवाई करत मनिष राजविर सौदागर (३३), अतुल बाबूराव गेडाम (४४), रवि चंदू समुद्रवार (३८) आणि शशीकांत परमेश्वर खोब्रागडे (४३) या चौघांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपींची अंगझडती घेतली असता ३ हजार रुपये रोख रक्कम मिळून आली. तसेच जुगाराच्या डावावरही रोख रक्कम व पत्ते आढळून आले.
या प्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.

0 Comments