#Varora
• सालोरी येन्सा ब्लॉक येथे बीटस्तरीय शालेय बालक्रीडा तथा सांस्कृतिक स्पर्धेचे थाटात उद्घाटन
वरोरा: ग्यानीवंत गेडाम
बालकांच्या सुप्त गुणांचा विकास व्हावा व कला गुणांच्या आविष्कारांची संधी मिळावी याकरिता शालेय बालक्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे तीन दिवसीय आयोजन दि. ७,८,९ जानेवारी २०२६ ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सालोरी येन्सा ब्लॉक येथे तीन दिवसीय महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन गजानन मुंडकर संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती वरोरा यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रेमानंद बोटरे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रणिता नौकरकर शिक्षण विस्तार अधिकारी बीट येन्सा, वंदनाताई निब्रड सरपंच, प्रमोद तोडासे उपसरपंच, सुवर्णा काळे वर लक्ष्मी फाउंडेशन जी ,एम, आर, सारिका धाबेकर अध्यक्ष तंटामुक्त गाव समिती, ग्यानीवंत गेडाम पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता, बाळकृष्ण बोढे ज्येष्ठ नागरिक, सरिता कुळमेथे उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, हर्षल निब्रड ग्रामपंचायत सदस्य, प्रतिभा मानकर ग्रामपंचायत सदस्य, अनिता आत्राम ग्रामपंचायत सदस्य, कैलास तोडासे जेष्ठ नागरिक, शंकरराव नागपुरे ज्येष्ठ नागरिक, भाऊराव कळस्कर जेष्ठ नागरिक, इंदुताई राऊत अध्यक्ष गुरुदेव महिला मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
दुसऱ्या सत्राच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन कौतुक मगरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पुरुषोत्तम सोमलकार, तर प्रमुख अतिथी म्हणून धनराज वांढरे, गणेश तोडासे, मयूर काकडे, पुंडलिक गायकी, सुवर्णा परसे ,कोमल राऊत, वर्षा आगलावे, रूपाली मेश्राम, गौवशा गोबाडे,शकुंतला गडेकर यांची उपस्थिती होती.
यावेळी येन्सा बीट अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी तथा सर्व मुख्याध्यापक, विषय शिक्षक, सहाय्यक शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत कमेटी, सर्व महिला बचत गट ,गुरुदेव सेवा मंडळ, तंटामुक्त समिती ,युवक मंडळ, महिला मंडळ ,माता पालक संघ, पालक शिक्षक संघ ,गुरुदेव क्रीडा मंडळ आणि समस्त ग्रामवासी यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणिक थुटे, सूत्रसंचालन विनोद आत्राम यांनी तर आभार प्रदर्शन प्रेमानंद बोटरे यांनी केले. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात शिक्षक व विद्यार्थी यांची भोजन व्यवस्था समस्त ग्रामवासी सालोरी यांचा ब्लॅक यांच्यावतीने करण्यात आलेली आहे. परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन याप्रसंगी आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरता गावातील सर्व युवक मंडळी, महिला बचत गट, सामाजिक कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम करीत आहेत.
0 Comments