हिंदूस्थान न्यूज 24 : ग्यानीवंत गेडाम
वरोरा - तालुक्यातील ग्रामपंचायत दहेगाव व दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे)यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सर्वरोग निदान व उपचार शिबिर दहेगाव येथे यशस्वीपणे पार पडले.
या आरोग्य शिबिराचे अध्यक्षस्थान डॉ. रमेश म. राजुरकर यांनी भूषविले, तर उद्घाटन व सत्कार आमदार करण संजय देवतळे (वरोरा–भद्रावती विधानसभा) यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी विशाल पारखी (सरपंच दहेगाव), डॉ. प्रतिकजी बोरकर (तालुका आरोग्य अधिकारी), संजीव सक्सेना,
बादल निळकंठ बेले, निकी चाबळा,सूरज (टाटा केयर),धनंजय पिंपळशेंडे,शारदा ढवळे,वसंत वाघ,गजानन ,विठ्ठल बोधाने,धीरज ताटेवार ,संध्याताई माकोडे,अतुल वाडसकर ,अविनाश जुमडे,महेश सोनटक्के यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
तसेच ग्रामपंचायत दहेगावचे पदाधिकारी, सदस्य, विविध सामाजिक संस्था व दहेगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला.
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, या उद्देशाने राबवलेला हा उपक्रम निश्चितच स्तुत्य व प्रेरणादायी ठरला.
0 Comments