शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी सामुहिक रजेवर

शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी सामुहिक रजेवर

हिंदुस्थान न्यूज 24 : संजय लोहकरे 
उपजिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर 

चंद्रपूर : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या प्रकरणात नागपूर विभागातील शिक्षण क्षेत्रातील अधिकारी - कर्मचाऱ्यांना विना चौकशी अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने सामुहिक रजेवर जाण्याची घोषणा केल्या नंतर चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व राजपत्रित अधिकारी -कर्मचारी सुद्धा दिनांक ८ आगष्ट २०२५ पासून सामुहिक रजा आंदोलनात सहभागी झाले आहेत. हे आंदोलन सुरू झाल्यापासून त्याचे पडसाद सोमवार दिनांक ११ आगष्टला सुद्धा दिसत होते. शिक्षण क्षेत्रातील सर्व कामकाज ठप्प असल्याने फाईलींचा ढीग पडला आहे. शिक्षकांचे पगार रखडले आहेत. 
शासन स्तरावरून कोणताही तोडगा न निघाल्यास हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
      या प्रकरणात नागपूर विभागातील शिक्षण उपसंचालक व इतर अधिकाऱ्यांना कोणतीही पुर्व चौकशी न करता थेट अटक केल्याने गट-अ अधिकाऱ्यांमध्ये संतापाची व असुरक्षेची लाट पसरली आहे. या संबंधात संघटनेने मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त यांना निवेदन देऊन चौकशी पुर्व अटकेपासून संरक्षणाची लेखी हमी मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा संघटनेने निर्णय घेतला आहे. मंगळवार दि. १२.८.२०२५ ला संघटनेचे शिष्टमंडळ मुंबईत शालेय शिक्षणमंत्री व शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव यांच्याशी चर्चा करणार आहेत.

Post a Comment

0 Comments