आनंद निकेतन महाविद्यालयाच्या यशाला नवा आयाम; एनसीसी कॅडेट्स MSF मध्ये निवडलेफ्टनंट संदीप पारखी यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी कॅडेट्सचे MSF यश

आनंद निकेतन महाविद्यालयाच्या यशाला नवा आयाम; एनसीसी कॅडेट्स MSF मध्ये निवड

लेफ्टनंट संदीप पारखी यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी कॅडेट्सचे MSF यश

दैनिक जागर मराठी: ग्यानीवंत गेडाम 

वरोरा : आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन वरोरा येथील एनसीसी विभागाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सेक्युरीटी फोर्स (MSF) मध्ये निवड होऊन महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. गोपाल गायकवाड, प्रतीक बोढे, अनिकेत तामटकर आणि प्रज्वल मारेकर या चारही कॅडेट्सची MSF मध्ये निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे तसेच त्यांचे मार्गदर्शक एनसीसी अधिकारी लेफ्टनंट संदिप पारखी यांचे शहरभरातून अभिनंदन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत सर्वाधिक निवड आनंद निकेतन महाविद्यालयाच्या एनसीसी कॅडेट्सची झाली असून ही बाब महाविद्यालयाच्या गुणवत्तेची साक्ष देणारी आहे.

या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांना दिले असून, त्यांच्या मार्गदर्शनामुळेच शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि स्पर्धात्मक तयारीला योग्य दिशा मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकवर्ग, कर्मचारी तसेच शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक व युवक संघटनांच्या वतीने विद्यार्थ्यांचा व लेफ्टनंट संदिप पारखी यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात येत आहे. आनंद निकेतन महाविद्यालयाचा एनसीसी विभाग भविष्यातही देशसेवेसाठी सक्षम अधिकारी घडवेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

0 Comments