“भाजप चंद्रपूर जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा यांच्या हस्ते श्री. जगन एल.के. महाराजांचे अन्नत्याग आंदोलन संपले”
हिंदूस्थान न्यूज 24 : जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर
पोंभुर्णा : तालुक्यातील केमारा, भटाडी व देवई या आदिवासी गावांमधील स्थायी निवासी पट्ट्यांचे प्रश्न, वनहक्कासंदर्भातील अडचणी तसेच इतर मूलभूत मागण्यांसाठी मागील २४ दिवसांपासून सुरू असलेले श्री. जगन एल.के. महाराज यांचे अन्नत्याग आंदोलन अखेर यशस्वीरीत्या मार्गी लागले. या आंदोलनामुळे आदिवासी बांधवांच्या दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले.
महाराष्ट्र सरकारचे माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालत संबंधित विभागांशी समन्वय साधला. महसूल, वन व पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी बैठका घेऊन अनेक प्रश्न तातडीने सोडविण्यात आले. तसेच उर्वरित मागण्या एका महिन्याच्या आत निकाली काढण्याचे ठोस व लेखी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.
या आश्वासनानंतर श्री. जगन एल.के. महाराज यांनी आपले अन्नत्याग आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा यांनी उपस्थित राहून श्री. जगन महाराज यांना नींबू पाणी पाजून उपोषणाची अधिकृत सांगता केली.
यावेळी डीवायएसपी ईश्वर कातकडे, तहसीलदार सेलवटकर, उपविभागीय पोलिस अधिकारी आमले, भाजप तालुकाध्यक्ष हरी पाटील ढवस, पिंटूभाऊ मंगलगिरीवार, राहुलभाऊ संतोषवार, नगराध्यक्ष सुलभाताई पिपरे, संतोष कुमरे, वनपरिक्षेत्र अधिकारी गौरकार, राऊंड ऑफिसर श्यामजी यादव, ईश्वर नेताम, मोहन चलाक, ठाणेदार वाघमारे, गणेश परचाके, गुरु पिपरे, बंडू बुरांडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments