सुप्रभात हेरिटेज मिलन : विद्यार्थ्यांनी जाणून घेतला बल्लारपूर किल्ल्याचा गौरवशाली इतिहास

#Ballarpur 
• सुप्रभात हेरिटेज मिलन : विद्यार्थ्यांनी जाणून घेतला बल्लारपूर किल्ल्याचा गौरवशाली इतिहास

हिंदूस्थान न्यूज 24: जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर 

बल्लारपूर येथील ऐतिहासिक किल्ला परिसरात क्रेसेंट पब्लिक स्कूल व क्रिएटिव माइंड्स प्री-स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने “सुप्रभात हेरिटेज मिलन” या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना आपल्या शहराच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाची ओळख करून देणे तसेच त्यांच्यात इतिहास, संस्कृती व राष्ट्रप्रेमाची भावना वृद्धिंगत करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या कार्यक्रमाला ईको-प्रो संस्था, चंद्रपूरचे अध्यक्ष तसेच राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते बंडू धोत्रे हे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी घनश्याम मूलचंदानी, वसंत खेडकर, चैताली मूलचंदानी आणि रजनी मूलचंदानी यांचीही विशेष उपस्थिती होती. आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनात बंडू धोत्रे यांनी विद्यार्थ्यांना बल्लारपूर किल्ल्याच्या ऐतिहासिक महत्त्वाविषयी सविस्तर माहिती दिली. गोंड राजे व मराठा सत्ताकाळातील गौरवशाली परंपरेचे हे किल्ले प्रतीक असून, एकेकाळी हा किल्ला परिसराच्या संरक्षण व प्रशासनाचे महत्त्वाचे केंद्र होता, असे त्यांनी सांगितले.

या उपक्रमात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे मोठ्या संख्येने विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षकवृंद तसेच शाळा व्यवस्थापन सहभागी झाले होते. हुमैरा खान यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विश्व भारती भगत, तसलीम पठाण, सुवर्णा जगझाप, हीना मिर्झा, रोशनबी पठाण, सुवर्णा रामटेके, विनय वासनिक, संजय श्रीवास्तव, रियाज खान, साहिल रहिकवार, जॉर्डन अझीम, धिरज राहुड, राजू यांच्यासह सर्व शिक्षक व सहकारी कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी शाळा व्यवस्थापनाने सर्व मान्यवर, पालक व सहभागींचे आभार मानले तसेच भविष्यातही अशा प्रकारचे शैक्षणिक व ऐतिहासिक उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments