हिंदुस्थान न्यूज २४: संजय लोहकरे
उपजिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर
चंद्रपूर : बहुजन समाज पार्टी जिल्हा चंद्रपूर व विधानसभा व शहर पदाधिकारी, यांची बैठक दिनांक 27 ऑगस्ट बुधवार ला दुपारी 1.00 वाजता शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत अध्यक्ष म्हणून महेंद्र मकेश्वर चंद्रपूर जिल्हा प्रभारी हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून रत्नाकर साठे जिल्हा अध्यक्ष, धर्मेश निकोसे जिल्हा प्रभारी, राजेश ब्राम्हणे, मिलिंद शेंडे जिल्हा, रामराव नन्नावरे, पांडुरंग तुमराम, नंदु खोब्रागडे, डॉ. विश्वनाथ लाडे जिल्हा उपाध्यक्ष, सुभाष पेटकर जिल्हा महासचिव, संतोष साखरकर जिल्हा संघटक, मनोहर बाम्बोडे जिल्हा कोषाध्यक्ष उपस्थित होते.
विधानसभेचे पदाधिकारी उपस्थित होते
जिल्हा बैठकीत महाराष्ट्र राज्य झोन बैठकीचा अहवाल सादर केला.
दिनांक 31 अगस्त मुंबई च्या कार्यक्रमाची चर्चा करून निवडक पदाधिकारी मुंबई ला जाण्याचे ठरविण्यात आले. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणूकां बाबत सुचना देण्यात आल्या.
जिल्हा पदाधिकारी दौरा सेक्टर बुथ वर - कैडर कैम्प व बैठकीचे आयोजन करण्याचे ठरले. जिल्हा तालुका शहर स्तरावर एकाच दिवशी व वेळेवर निवेदन देण्याचे ठरले.
सर्व विषयावर सविस्तर चर्चा झाली यावेळी मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
0 Comments