लोकमान्य महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन संपन्न
लोकमान्य महाविद्यालयाच्या ग्रंथालय आणि विद्यार्थी विकास या विभागांच्या संयुक्त विद्यमाने 15 ऑक्टोबर 2025 ला वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या प्रमुख अध्यक्षा लोकमान्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.जयश्री शास्त्री यांनी विद्यार्थ्यांना नियमित वाचन केल्यास तुम्ही अभिरुची संपन्न वाचक व्हाल असे सांगितले. तर इंटरनेट द्वारे मिळणाऱ्या साहित्याचा वाचनापेक्षा ग्रंथ वाचनाचा आनंद सर्वश्रेष्ठ असतो असे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. तानाजी माने (राज्यशास्त्र विभाग, प्रमुख लोकमान्य महाविद्यालय, वरोरा) यांनी सांगितले. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी सहभागी झाले होते.
0 Comments