*गोंडवाना विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत लोकमान्य महाविद्यालयाच्या बारा विद्यार्थिनींचा समावेश*

*गोंडवाना विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत लोकमान्य महाविद्यालयाच्या बारा विद्यार्थिनींचा समावेश* 

लोक शिक्षण संस्था,वरोरा द्वारा संचालित लोकमान्य महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर विभागातील बारा विद्यार्थ्यांनी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या  (शैक्षणिक सत्र 2024-२०२५) गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. त्यात बी.ए. या अभ्यासक्रमात राज्यशास्त्र विषयात  कु.वैष्णवी अरविंद काळे यांनी सर्वाधिक गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला. बी.कॉम सर्वसाधारण गुणवत्ता यादीत कु.शितल बापूराव गावंडे यानी दहावे स्थान तसेच  महाविद्यालयातील पदव्युत्तर विभागातून विद्यापीठ गुणवत्ता यादीत इतिहास या विषयात कु.वैष्णवी प्रमोद बल्की  यांनी प्रथम व कु.तुलसी हरिभाऊ बन्सोड यांनी दुसरे स्थान प्राप्त केला, तर इंग्रजी विषयात कु.मोहिनी माऱोती पोटे यांनी प्रथम स्थान तर राज्यशास्त्र या विषयात कु.अर्चना विजय ढेन्गळे यांनी दुसरे व कु.रेश्मा अशोक नरडे यांनी पाचवे तर अर्थशास्त्र या विषयात कु.कीर्ती पुरुषोत्तम आवारी यांनी तिसरे व कु. निशा लक्ष्मण मत्ते यांनी चतुर्थ स्थान,तर समाजशास्त्र विषयात कु.मंगला सुधाकर बरडे यांनी दुसरे व कु.धनश्री सुधाकर आसेकर यांनी तिसरे स्थान तर मराठी या विषयात कु.प्रियंका गजानन दरेकर यांनी चतुर्थ स्थान मिळविलेआहे. महाविद्यालयाच्या या विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल लोक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  मा. प्रा. श्रीकांतजी पाटील, उपाध्यक्ष श्री.विकासजी घुडे, कार्यवाह प्रा. विश्वनाथजी  जोशी, अँड. दुष्यंतजी देशपांडे व इतर सन्माननीय पदाधिकारी तसेच लोकमान्य महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. जयश्री शास्त्री, महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी गुणवंत  विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments