पाचगाव (ठा.) येथे बाल सुसंस्कार शिबिर यशस्वीरीत्या संपन्न.
विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठा रुजविणारा उपक्रम
हिंदुस्तान न्यूज 24: रेखा चंडाले डिस्टिक रिपोर्टर चंद्रपुर
वरोरा- तालुक्यातील पाचगाव (ठाकरे) येथे श्री गुरुदेव सुसंस्कार शिबिर समिती, टेंमुर्डा यांच्या वतीने बाल सुसंस्कार शिबिर उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. हे शिबिर सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आले असून यावर्षी देखील शेकडो बालकांचा सहभाग लाभला.
१६ मे रोजी सायंकाळी पाच वाजता शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटक म्हणून डॉ. बोंडे (गुरुदेव प्रचारक अध्यक्ष) तर प्रमुख अतिथी म्हणून वाल्मिकराव वैद्य (प्रांत सेवाधिकारी), नामदेव काळे, डॉ. अंकुश आगलावे, डॉ. सरवदे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिराचे आयोजन जनार्दन देठे (प्रमुख मार्गदर्शक) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. माणिक डुकरे (व्यवस्थापक), शामराव काळे (अध्यक्ष), हितेश गुगल (उपाध्यक्ष), मनोज ढोके (सचिव) तसेच नियोजन प्रमुख आशिष माणुसमारे, अमित निब्रड, शैलेश खिरटकर, अशोकराव भोंग, रामदास बारतीने, भारत ठावरी, यजमान सातपुते, कवडू आत्राम यांचा मोलाचा सहभाग लाभला.
१६ ते २५ मे २०२४ या कालावधीत पार पडलेल्या शिबिरात विद्यार्थ्यांना ग्रामगीता व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार समजावून देत, त्यांच्या जीवनमूल्यांचा अभ्यास करून सद्गुणांच्या रोपांची पेरणी करण्यात आली.
शिबिरात विद्यार्थ्यांसाठी प्राप्तस्मरण, सामुदायिक ध्यान, योग व प्राणायाम, भक्ती संगीत, वाद्य प्रशिक्षण (टाळ, खंजिरी, तबला, हार्मोनियम), भजन गायन, संत वाङ्मय अभ्यास, मैदानी खेळ (लाठी-काठी, कुस्ती, कराटे, मल्लखांब, लेझीम), तसेच परिसर स्वच्छता यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
शिबिराच्या समारोपप्रसंगी रविदादा मानव (संचालक, अध्यात्म गुरुकुल, गुरुकुंज मोझरी), ज्ञानेश्वर रक्षक (प्रचारक, गुरुदेव सेवा मंडळ), महादेव सुरदुसे (पोलीस उपनिरीक्षक, शेगाव), जनार्धन देठे (अध्यक्ष, ग्राम तत्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिर, पंढरपूर), आणि सेवकराम मिलमीले (प्रचारक, गुरुदेव सेवा मंडळ) यांची उपस्थिती लाभली.
स्वप्नील कुथे, करण नेवारे, , लोकेश जीवतोडे,नामदेव सातपुते, यश झाडे, गोकुळ आत्राम, अनिकेत ढुकसे,नरेंद्र सातपुते, वेदिका भोयर,शर्वरी मिटकर लावण्या झाडे,रचना आस्वले यांनी प्रशिक्षक म्हणून महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली.
गावातील नागरिक, स्थानिक पुढारी आणि गुरुदेव सेवा मंडळ यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करत शिबिरार्थ्यांसाठी मोफत भोजन व नाश्त्याची सुविधा उपलब्ध करून दिली.
0 Comments