ट्रक ने माय लेकीला चिरडले, दोघींच्याही घटनास्थळीच करून अंत

ट्रक ने माय लेकीला चिरडले, दोघींच्याही घटनास्थळीच करून अंत 

हिंदुस्तान 24न्यूज: संजय लोहकरे 
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर 


बल्लारपूर:आज दुपारी 12.45 ते 1.00 वाजता च्या दरम्यान ज्योति बंडू रागिट ( वय 38 वर्ष ) राजूरा वरून आपल्या आईच्या घरी चंद्रपुर  येथे दुचाकी वाहन क्र. MH 34 BN 5538  ने आपल्या 8 वर्षाची मुलगी सेजल सोबत जात होती. वर्धा नदी चा पूल समाप्त होताच  बल्लारपूर च्या सरहदीत जलाराम मंदिर च्या सामोरं ज्योति रागिट हिचे दुचाकी वाहनास मालवाहक ट्रक क्र. MH 34 BZ 7699 ने धडक दिली व दोघीही खाली पडल्यामुळे ट्रक च्या मागील टायर मध्ये आल्याने आई ज्योति व मुलगी सेजल या दोघींचाही घटनास्थळीच मृत्यू झाला . दोन्ही शवांना शव विच्छेदनासाठी बल्लारपुर च्या ग्रामीण रूग्णालयात पाठवण्यात आले.
  मृत ज्योति चे पति बंडू रागिट आणि 16 वर्षाची मुलगी तथा 8 वर्षाची सेजल एवढेच सदस्यांचा हा परिवार नेहरू चौक राजूरा येथे राहत होता. ज्या ट्रक ने ही घटना घडली त्या ट्रक च्या ड्राइवर ला ताब्यात घेतल्या गेले. भारतीय न्याय संहिता च्या अंतर्गत धारा 281, 106 (1), मोटर वाहन अधिनियम 184, 134 च्या अंतर्गत सदर गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढिल तपास व कार्यवाही बल्लारपूर पोलिस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments