*पक्षांतरामुळे काँग्रेस पक्षाच्या वाढीचा मार्ग मोकळा*
*भाजपात गेल्यामुळे काँग्रेसक्षातआनंदाचे वातावरण
हिंदुस्तान न्यूज 24: रेखा चंडाले डिस्टिक रिपोर्टर चंद्रपुर
जिवती:- नुकतेच काँग्रेस पक्षातील
दोन नगरसेवक आणि काँग्रेस चे दोन पदाधिकारी यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. त्याबाबत काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेला डॉ अंकुश गोतावळे जिल्हासरचिटणीस तथा उपाध्यक्ष/गटनेता न प जीवती, तसेच गणपत आडे तालुकाध्यक्ष, विलास पवार सभापती नप, उत्तम कराळे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, प्रा सुग्रीव गोतावळे माजी उपसभापती,दत्ता गायकवाड माजी सरपंच, अमोल कांबळे अध्यक्ष युवक काँग्रेस, तिरुपती पोले ओबीसी सेल, सीताराम मडावी अनु. जमाती सेल, विजयकुमार कांबळे अनु. जाती सेल, दिवाकर वेट्टी, प्रदीप कांबळे यांनी संबोधित केले. त्यांच्यासोबत पक्षाचे इतरही कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्षप्रवेशाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की जे नगरसेवक शामराव गेडाम हे भाजप मध्ये गेले ते मुळात भाजपचेच होते,आणी ज्या पक्षाचा आमदार असतो त्या पक्षात ते प्रवेश करीत असतात असाच त्यांचा इतिहास आहे. आणि जे शहराध्यक्ष आशिष डसाने गेले भाजप मध्ये गेले तेही मुळात राष्ट्रवादीचे होते तेही सतत सत्ताधारी पक्षासोबत राहण्यात धन्यता मानतात. पण नगरसेविका श्रीमती तयामबी शेख या काँग्रेस चे पदाधिकारी असफाकभाई शेख यांच्या मातोश्री आहेत. अशफाकभाई शेख यांचा बांधकामाचा व्यवसाय असून त्यांची अनेक ठिकाणी कामे सुरु आहेत. राजुरा विधानसभा क्षेत्रात चमत्कार होऊन भाजप चे आमदार झाले आहेत. त्यामुळे अशफाकभाई शेख यांना नवीन कामे घेण्यात अडचण येत होती म्हणून ते अस्वस्थ होते.या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून कदाचित त्यांनी पक्षप्रवेश केला असेल असा अंदाज सर्वांनी मांडला.कारण काँग्रेस पक्षाने त्यांना सायकल दुरुस्ती मेकॅनिक ते बांधकाम व्यावसायिक असा प्रवास घडवून आणला सोबतच पद, प्रतिष्ठा दिली त्यामुळे काँग्रेस मध्ये त्यांच्यावर कोणताही अन्याय झाला नसताना त्यांनी पक्ष सोडला त्यामुळे बांधकाम व्यवसायातील अडचणी यापलीकडे दुसरे कोणतेच कारण असू शकत नाही असे सर्वांनी सांगितले. काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये असफाकभाई शेख यांच्याबद्दल आणि त्यांच्या कार्यशैलीबद्दल प्रचंड नाराजी होती.कारण यापूर्वी काँग्रेस चे जिवती नागपंचायत मध्ये दहा नगरसेवक असताना असेच भाजप सोबत जाऊन 8 काँग्रेस च्या लोकांना सत्ते पासून वंचित ठेवन्याचा प्रताप अशफाकभाई शेख यांनी केला होता.त्यामुळे अनेक निष्ठावंत आणि जनाधार असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर अन्याय झाला होता. या घटनेनंतर जिवती तालुक्यातील अनेक निष्ठावान आणि प्रामाणिक कार्यकर्ते काँग्रेस पक्षाच्या कामापासून अलिप्त झाले होते. आता मात्र असफाकभाई शेख यांच्या पक्ष सोडण्यामुळे काँग्रेस पक्षात उत्साहाचे वातावरण असून जुने कार्यकर्ते यापुढे जोमाने कामाला लागतील असे मत अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. त्यामुळे मागील दिवसापासून पक्षाची जी वाढ खुंटली होती ती वाढ आता झपाट्याने होईल असा विश्वास सुद्धा सर्व पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखविला. तसेच पक्षामध्ये अनेक कार्यकर्ते येण्यासाठी उत्सुक असून नवीन येणाऱ्या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले जाईल आणि कर्तृत्वानुसार संधी दिली जाईल.तसेच काल जे काही लोकं काँग्रेस मधून भाजप मध्ये गेले ते आता पश्चाताप करीत आहेत कारण ज्या व्यक्तीला कंटाळून ते काँग्रेस सोडून भाजपात गेले आता तीच व्यक्ती भाजप मध्ये सामील झाली आहे.सदर व्यक्ती भाजप मध्ये येणार आहे हे माहित असते तर आम्ही पक्षच सोडला नसता अशी कुजबुज आता ऐकायला येत आहे. झाले असे की "सासुसोबत जमत नाही म्हणून घराची वाटणी केली आणि सासूच हिश्याला आली" असा प्रकार काँग्रेस सोडून भाजप मध्ये गेलेल्यांसोबत घडला आहे.पत्रकार परिषदेत सर्वांनीच एक भावना व्यक्त केली की, ज्या लोकांनी काँग्रेस पक्ष सोडला आहे त्यामुळे आता वाढीचा मार्ग मोकळा झाला असून निष्ठावंत कार्यकर्ते आनंदी असल्याचे दिसून आले.
0 Comments