नारायणपूरमध्ये भव्य वाढदिवस सोहळा; राजे अम्ब्रीशराव महाराजांची विशेष उपस्थिती

नारायणपूरमध्ये भव्य वाढदिवस सोहळा; राजे अम्ब्रीशराव महाराजांची विशेष उपस्थिती

📡 *हिंदुस्तान* *न्यूज़* *24* 
 
 ✍️ *रेखा* *चंडाले*

👉 *जिल्हा* , *प्रतिनिधी* 

गडचिरोली : सिरोंचा  तालुक्यातील नारायणपूर येथे आयोजित एका कौटुंबिक समारंभाला राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभल्याने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष संपत दया यांच्या सुपुत्र “अगस्त्या” यांच्या प्रथम वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी विशेष अतिथी म्हणून हजेरी लावली.

कार्यक्रमस्थळी आगमन होताच राजे अम्ब्रीशराव महाराज यांचे ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीसह आणि फुलांच्या वर्षावात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर उत्साहमय झाला होता.

यावेळी राजे साहेबांनी बाळ “अगस्त्या” यास वाढदिवसानिमित्त शुभ आशीर्वाद देत त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. शेतकरी कुटुंबाकडून झालेल्या सन्मानाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत दया कुटुंबाचे आभार मानले.

या प्रसंगी युवा नेते कुमार अवधेशराव आत्राम, भाजपा तालुका अध्यक्ष श्रीनाथ राऊत, जिल्हा उपाध्यक्ष शंकर नरहरी, जिल्हा सचिव संतोष पडलवार, अल्पसंख्यांक आघाडीचे तालुका अध्यक्ष शाहरुख पठाण, जिल्हा महिला महामंत्री प्रीतीताई शंभरखर, तालुका उपाध्यक्ष चंद्रशेखर चेम्मकारी यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments