स्वातंत्र्यदिना निमित्त नवीन दहेली येथील नवयुवक पंचशील बौद्ध मंडळातर्फे वृक्षारोपण

 स्वातंत्र्यदिना निमित्त नवीन दहेली येथील नवयुवक पंचशील बौद्ध मंडळातर्फे वृक्षारोपण



नवीन दहेली (लावारी) : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करत असताना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी नवयुवक पंचशील बौद्ध मंडळ, नवीन दहेली (लावारी) यांच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून गावातील परिसरात विविध रोपांची लागवड करण्यात आली. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच आगामी पिढ्यांसाठी हिरवाईचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. ‘वृक्ष लावा, पर्यावरण वाचवा’ तसेच स्वच्छ व हरित गावाचा संदेश यावेळी उपस्थितांना देण्यात आला.

वृक्षारोपण केवळ एक दिवसाचा उपक्रम न राहता लावलेल्या झाडांची नियमित देखभाल व संगोपन करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. गावातील युवकांनी आणि नागरिकांनी पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले.

या वृक्षारोपण कार्यक्रमाला अंकुश जिवणे, अमिश मेश्राम, सुमित गोरघाटे, विलास माऊलीकर, शुभम तेलंग, वैभव निमसरकर, हर्षल निमसरकर, साहिल मेश्राम, विकास निरंजने, युवराज निरंजने, अनिता निरंजने, शोभा गोरघाटे, श्रेया दुधे, संध्या निरंजने यांच्यासह समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला.

Post a Comment

0 Comments