•संजय भोकरे यांच्या विरोधातील कथित कटाचा शंकर बोरघरे यांच्याकडून तीव्र निषेध • “सत्यासाठी लढणाऱ्या नेतृत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न सहन करणार नाही” शंकर बोरघरे

संजय भोकरे यांच्या विरोधातील कथित कटाचा शंकर बोरघरे यांच्याकडून तीव्र निषेध

“सत्यासाठी लढणाऱ्या नेतृत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न सहन करणार नाही”  शंकर बोरघरे

हिंदूस्थान न्युज 24: पुंडलिक येवले
तालुका प्रतिनिधी, भद्रावती

     महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे संस्थापक तथा दैनिक जनप्रवासचे मालक संजय भोकरे सर यांच्या विरोधात रचण्यात आलेल्या कथित कटकारस्थानाचा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष शंकर बोरघरे यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. सामाजिक न्यायासाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या नेतृत्वाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
  शंकर बोरघरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “संजय भोकरे सर हे सामान्य जनतेच्या हक्कांसाठी कायम लढणारे नेतृत्व आहे. पत्रकारिता आणि सामाजिक चळवळीच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचे काम केले. अशा व्यक्तीविरोधात कट रचणे ही अत्यंत गंभीर आणि निंदनीय बाब आहे.”
    ते पुढे म्हणाले की, “सत्य मांडणाऱ्यांना दबावाखाली आणण्याचा प्रयत्न काही स्वार्थी प्रवृत्तींकडून केला जात आहे. मात्र अशा प्रकारांना संघटना कधीही घाबरणार नाही. आम्ही भोकरे सरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.”
    दरम्यान, या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून संपूर्ण सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणीही शंकर बोरघरे यांनी केली आहे. चंद्रपूर तसेच गडचिरोली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनीही या घटनेचा निषेध करत भोकरे यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर मोहिम सुरू केली आहे.
   कार्यकर्त्यांकडून #संजयभोकरे_पाठीशी, #निषेध, #सत्यासाठी_लढा अशा हॅशटॅगद्वारे समर्थन व्यक्त करण्यात येत असून, “संघर्ष थांबणार नाही… सत्याचा आवाज दबणार नाही!” असा इशाराही देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments