CCMP पात्र BHMS डॉक्टरांच्या MMC नोंदणीला IMA आनंदवन-वरोरा शाखेचा विरोध; तहसीलदारांना निवेदन
वरोरा | दि. ६ ऑगस्ट २०२६
इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) आनंदवन-वरोरा शाखेच्या वतीने गुरुवारी एसडीएम संदीप भस्के, वरोरा यांना निवेदन देण्यात आले. CCMP पात्रता प्राप्त BHMS डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) मध्ये नोंदणी करून त्यांना आधुनिक वैद्यक (Modern Medicine) करण्यास परवानगी देण्याच्या प्रस्तावाला IMA ने तीव्र विरोध दर्शविला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, केवळ एका वर्षाच्या CCMP अभ्यासक्रमाच्या आधारे MBBS डॉक्टरांप्रमाणे आधुनिक वैद्यकीय सेवा देण्याची परवानगी देणे हे रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. MBBS अभ्यासक्रमातील व्यापक शिक्षण व प्रत्यक्ष प्रशिक्षणाची जागा CCMP अभ्यासक्रम घेऊ शकत नाही, असे IMA चे मत आहे.
तसेच, पुराव्यावर आधारित (Evidence-based) वैद्यकीय उपचार पद्धतीची गुणवत्ता व विश्वासार्हता यावरही याचा परिणाम होऊ शकतो. CCMP पात्र BHMS डॉक्टरांची MMC मध्ये नोंदणी झाल्यास सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असून, हा विषय सध्या मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे अंतिम निर्णय होईपर्यंत कोणतीही अंमलबजावणी करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
IMA ने आपल्या निवेदनात BHMS डॉक्टरांची नोंदणी आधीच महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेत असल्याचे नमूद करून, MMC मध्ये स्वतंत्र नोंदणीची आवश्यकता नसल्याचेही स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री यांनी या विषयात तातडीने हस्तक्षेप करावा.
संबंधित विभागाकडे निवेदन त्वरित पाठविण्यात यावे.
मुंबई उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय होईपर्यंत CCMP पात्र BHMS डॉक्टरांची MMC मध्ये नोंदणी स्थगित ठेवावी.
रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आधुनिक वैद्यकीय शिक्षण व व्यवसायाचे उच्च दर्जाचे निकष कायम ठेवावेत.
या निवेदनाद्वारे जनहित, रुग्णांची सुरक्षितता आणि आधुनिक वैद्यकीय सेवेची गुणवत्ता अबाधित ठेवण्यासाठी शासनाने तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशन, आनंदवन-वरोरा शाखेच्या वतीने करण्यात आली.यावेळी डॉ नितीन देवतळे, डॉ आकिब शेख,डॉ चांडक, डॉ पराते, डॉ जाजू,डॉ लांबट, डॉ मुळेवार, डॉ हिवरकर, डॉ डांगरे, डॉ उमरे, डॉ भेंडे, डॉ कलंबे, डॉ ताटकुंडवार, महिला डॉ पराते मॅडम, डॉ चांडक मॅडम, डॉ खापणे मॅडम, डॉ हरियाणी मॅडम, डॉ कामडी उपस्थित होते.
0 Comments