गडचांदूर : गडचांदुर येथील प्रभाग क्रमांक ३ मध्ये पेव्हिंग ब्लॉक विकासकामाचे उद्घाटन करण्यात आले. यानिमित्ताने परिसरातील सुरू असलेल्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
भेटीदरम्यान स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, सूचना आणि विकासाबाबतच्या अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याची गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
दर्जेदार पायाभूत सुविधा, पारदर्शक कामकाज आणि लोकसहभागाच्या माध्यमातून सर्वसमावेशक विकास साधणे, हीच आमची बांधिलकी आहे.प्रभाग क्रमांक ३ मधील प्रत्येक विकासकाम वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि जनतेच्या अपेक्षेनुसार पूर्ण व्हावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा करेल.
0 Comments