एक मोकळा श्वास कृषी व ग्रामीण पर्यंटन केंद्राचा उपक्रम पर्यटकांनी अनुभवली भात पेरणी (रोवणी)

एक मोकळा श्वास कृषी व ग्रामीण पर्यंटन केंद्राचा उपक्रम 

पर्यटकांनी अनुभवली भात पेरणी (रोवणी) 
राजुरा - आजच्या आधुनिक पिढीला पिज्जा, बर्गर व इतर खाद्यपदार्थ कसे बनवितात हे माहित आहे परंतू आपल्या रोजच्या जेवणात असलेला भात कसा येतो, कुठून येतो याची माहिती मात्र नाही. धानापासून तांदूळ व तांदळा पासून भात कसा येतो याची जाण या नव्या पिढीला व्हावी या हेतूने चनाख्याच्या एक मोकळा श्वास कृषी व ग्रामीण पर्यटन केंद्राच्या वतीने भात पेरणी (रोवणी) चा अनोखा कार्यक्रम आयोजित केला होता. यात पर्यटकांनी व बालगोपालांनी भात पेरणीचा (रोवणी) प्रत्यक्ष चिखलात उतरूण अनुभव घेतला.
       राजुरा तालुक्यातील चनाखा येथे एक मोकळा श्वास कृषी व ग्रामीण पर्यटन केंद्राच्या माध्यमातून आनुनिक शेती विषयक परिसरातील शेतकऱ्यांना विविध माहिती तर पर्यटनाच्या माध्यमातून शेती नेमकी कशी, आपली ग्रामीण संस्कृती काय याचा अनुभव निसर्गरम्य वातावरणात लहान मुलांपासून आबाल वृद्धांना दिल्या जात आहे. याठीकाणी असलेल्या विविध प्रकारच्या  झाडांची, पिकांची माहिती तर मिळतेच सोबतच या केंद्राच्या मार्फत विविधांगी उपक्रमही राबविले जात असून याच उपक्रमाअंतर्गत लहान मुलांनाच नव्हे तर मोठ्यांना सुद्धा आज भाताची लागवड कशी केली जाते किंवा भात कसा पिकविला जातो याची माहिती नाही. ती माहिती व्हावी या हेतूने भात लागवडीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी या  कार्यक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली होती.
   पर्यटकांनी आपल्या मुलांबाळांसोबत भात लागवडीचा अनुभव घेतला. भात रोवणीच्या वेळी मोठ्या  प्रमाणात चिखल करून त्याची रोवणी केली जाते याचा अनुभव पर्यटकांनी घेतला.  याप्रसंगी एक मोकळा श्वास कृषी पर्यटन केद्रात आलेले पर्यटक माऊंट लिटेरा झी स्कूल च्या मुख्याध्यापिका शोभा लक्ष्मीनारायण सोनी, शिक्षिका रुपा शर्मा, लीना कुकरा,  स्मिता शिमोन, शयामला शेंडे, रितू चौधरी, एक मोकळा श्वास कृषी पर्यटन केंद्राचे संचालक  नितिन मुसळे,  शुभांगी मुसळे सह  शेखर धोटे, सोनाली धोटे, साईनाथ इंगोले, रूचीता इंगोले,  कोशल मुसळे, अवनी इंगोले सह पर्यटक उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments