हिंदुस्थान न्यूज 24 : ग्यानिवंत गेडाम (उपसंपादक)
वरोरा तालुक्यातील ग्राम पंचायत चिनोरा चे ग्रामसेवक एकनाथ चापले यांचा ग्रामवाशी चिनोरा तर्फे सेवानिवृत्त सत्कार करण्यात आला.या कार्यक्रम सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष अविनाश ढेंगळे माजी पंचायत समिती सदस्य हे होते.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती वंदना ढेंगळे उपसरपंच ग्राम पंचायत चिनोरा तसेच पोलिस पाटील रुपेश ढोके, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुरेश कामडी,नवयुवक दुर्गा उत्सव चिनोरा चे अध्यक्ष संदीप वखनोर,शाळा कमिटीचे अध्यक्ष संतोष सिंग,शंकर कुरडेकर,मयुर टोंगे ,माजी सरपंच विनोद जेणेकर व स्वराज ग्रुप चे अध्यक्ष निलेश अंबाडे यांची प्रमुख उपस्थिती होती .या कार्यक्रमाला गावातील बहु संख्येने ग्रामवाशी हजर होते. या कार्यक्रमाचे संचालन महेश दसमेर यांनी केले तर आभार प्रदर्शन मोनी राऊत यांनी मानले .या वेळी सेवानिवृत्त सत्कार मूर्ती एकनाथ चापले यांना शाल श्रीफळ व भेट वस्तू देऊन त्यांचा ग्रामवाशी चिनोरा कडून सत्कार करण्यात आला.
0 Comments