• राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिन आनंद निकेतन महाविद्यालयात उत्साहात साजरा • स्वयंसेवकांनी समाजकार्यासाठी स्वयंप्रेरणेने पुढे यावे – प्रा. डॉ. अविनाश पंधरे

राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिन आनंद निकेतन महाविद्यालयात उत्साहात साजरा

 स्वयंसेवकांनी समाजकार्यासाठी स्वयंप्रेरणेने पुढे यावे – प्रा. डॉ. अविनाश पंधरे 

वरोरा - ग्यानीवंत गेडाम 
 आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन वरोरा येथे राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे, प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. अविनाश पंधरे , प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य राधा सवाने , कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश राठोड, कनिष्ठ महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. नीरज आत्राम आदी मान्यवर उपस्थित लाभली .

 प्रथमता राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या फोटोच्या पूजनाने झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुरेश राठोड कार्यक्रम अधिकारी यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी उपप्राचार्य प्रा. राधा सवाने यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना सामाजिक कार्याचे महत्व पटवून दिले.
त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. अविनाश पंधरे यांनी विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची उद्दिष्टे, महत्व आणि स्वयंसेवकाची कर्तव्य स्पष्ट करताना सांगितले की – “विद्यार्थ्यांनी समाजकार्यासाठी स्वतःला वाहून घेणे हे खरे स्वयंसेवकाचे आद्य कर्तव्य आहे. तसेच स्वच्छता, झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरण रक्षण, पर्यावरण संवर्धन, रक्तदान, लोकांसाठी मदत कार्य अशा प्रकारच्या अनेक उपक्रमांतून विद्यार्थ्यांचे नेतृत्वगुण विकसित होतो आणि त्याचा सर्वांगीण विकास होतो.” तसेच “सामाजिक बदल घडविण्यासाठी स्वयंप्रेरणा आणि कर्तव्यभावना स्वयंसेवकांमध्ये असणे अत्यावश्यक आहे.” असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमात काही कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एनएसएसचे कार्य, महत्त्व अधोरेखित करणारी आकर्षक पोस्टर्स तयार करून ती पोस्टर्स विद्यार्थ्यांसमोर सादर करून घोषवाक्य चे महत्व सांगण्यात आले. यातून पोस्टर्स संदेशाद्वारे स्वयंसेवेचे विविध पैलू उलगडून या सेवा योजनेच्या कार्याची माहिती दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष समारोपामध्ये प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन स्वयंसेवकांनी राष्ट्रीय कार्यासाठी सदैव तत्पर राहावे, आणि राष्ट्राची सेवा करावी असे सांगितले. या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना गीत सादर करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन कु. श्रुतिका घेंगारे हिने तर उपस्थितांचे आभार कु.शितल भुते हिने मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सर्व स्वयंसेवकांचे हातभार लागले.
या कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थ्यांसह शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments