भद्रावती: नगर परिषद वरोरा चे माजी नगराध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे चे माजी जिल्हा सचिव तसेच भाजप अल्पसंख्यक आघाडी चे माजी प्रदेश उपाध्यक्ष श्री.अहेतेशाम अली यांनी आपल्या समर्थकांसोबत काँग्रेस मध्ये भव्य पक्ष प्रवेश करीत आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून २१००० पेक्षा जास्त मते घेऊन अहेतेशाम अली यांनी आपल्या जनाधाराची ळख करुन दिली व वरोरा-भद्रावती विधानसभेत त्यांनी आपले नेतृत्व कौशल्य सिद्ध केले. एन.एस.यु.आय., युवक काँग्रेस माध्यमातून राजकारणात आलेले अहेतेशाम अली काँग्रेस चे वरोरा शहर अध्यक्ष असतांना माजी मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री स्व.संजयबाबू देवतळे यांच्या सोबत २०१४ ला भाजप मधे प्रवेश केला होता. देवतळेंचे ते समर्थक होते व गेली १० वर्षे भाजप मधे होते. ते २०१६ च्या वरोरा न.प. निवडणुकीत भाजप च्या चिन्हावर जनतेतून थेट नगराध्यक्ष म्हणून जिल्ह्यात सर्वात जास्त मतांनी निवडून आले.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते खासदार मा.श्री.राहुल गांधी, मा. खासदार श्रीमती प्रियंका गांधी, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री. हर्षवर्धनदादा सपकाळ
यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन व त्यांच्या कार्याने प्रभावीत होऊन चंद्रपूर लोकसभेच्या सक्रिय व धाडसी खासदार श्रीमती प्रतिभाताई बाळुभाऊ धानोरकर यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वात अहेतेशाम अली यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून लोकशाही वाचविण्याच्या या लढाईत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आज नागपूर येथील प्रेस क्लब येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.हर्षवर्धनदादा सपकाळ व मा. खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेश सोहळ्याला भद्रावती भाजपा तालुकाध्यक्ष तूळश्रीराम श्रीरामे, दादापाटील झाडे- संचालक नंदोरी सेवा सहकारी संस्था, अशरफ खान - जिल्हा महासचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजरी,बंडूभाऊ लभाने , सादिक अली,शाहिद अली, धर्मेंद्र हवेलीकर,अनिल खडके माजी सरपंच, मारोती झाडे माजी सरपंच टेमुर्डा, गणेश जोगी ग्राम पं.सदस्य फत्तापूर,जयंत चंदनखेडे,, सुभाष वाटकर बोर्डा पंचायत समिती प्रमुख भाजपा, सौ. चंद्रकलाताई मते - अध्यक्ष महिला गुरुदेव सेवा मंडळ वरोरा, जितुभाऊ कांबळे - ग्राम पं.सदस्य बोर्डा,गणेश बादकि - ग्राम पं सदस्य, महालगाव,सुधाकर कुंकुले, लक्ष्मण नेहारे, संदीप विधाते,सुनील बिंजवे, आतिश बोरा, कादर शेख,सुनील हलमारे,पवन वरघणे, बाबू शेख, हरिशचंद्र चांभारे, इमरान शेख,पवन डांगरे नागरी,सुनील गेडाम,योगेश फुलझले केळी, वसीम शेख,रवी पवार,आदेश मेश्राम, रमेश मते,फिरोज शेख,परवेज शेख,अरविंद खोकले, साबीर शेख,लेखू केशवाणी,विजय धोपटे,विजय लांबट,पंकज शेंडे,अनिता शाह, सीमा वाकडे,राधा पर्बत, सावी भगत, निलोफर शेख यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
या प्रवेशाने वरोरा-भद्रावती सह चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला फायदा होणार असून खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे हात अधिक बळकट होणार असल्याने जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
0 Comments