#Bhadravti
हिंदुस्थान न्यूज 24: मनोज मोडक
विषेश जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
भद्रावती : स्थानिक NGO हेल्पिंग हँड्स मल्टीपर्पस सोसायटी भद्रावती च्या वतीने भद्रावती गरबा दांडिया उत्सव समिती द्वारे गरबा दांडिया उत्सव स्पर्धा २०२५ आयोजित करण्यात आली. भारतीय नवरात्री सणाचे अवचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नियोजना अंतर्गत दि. २९, ३० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२५ या तीन दिवसाच्या कालावधीत भव्य दांडीया स्पर्धा यशस्वी आयोजित करण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख उद्घाटक म्हणून हंसराज अहिर, माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री व राष्ट्रीय ओबीसी आयोग अध्यक्ष, भारत सरकार यांनी उपस्थिती दर्शवली. शुभेच्छुक कारण देवतळे, आमदार ७५ वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र आणि सुधीरभाऊ मुनगंटीवार, वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य, आमदार बल्लारपूर विधानसभा क्षेत्र यांनी कार्यक्रमाकरिता शुभेच्छा मिळाल्या. कार्यक्रमाला मुख्य उपस्थिती म्हणून डॉक्टर विशाखा शेळके मुख्याधिकारी नगर परिषद भद्रावती, योगेश्वर पारधी, ठाणेदार पोलीस स्टेशन भद्रावती,राजेश भांडारकर तहसीलदार भद्रावती, अनिल धानोरकर माजी नगराध्यक्ष भद्रावती, अमित गुंडावार सामाजिक कार्यकर्ता भद्रावती, प्रशांत डाकरे सामाजिक कार्यकर्ता भद्रावती महेंद्र गावंडे सामाजिक कार्यकर्ता भद्रावती, युवराज धानोरकर सामाजिक कार्यकर्ता भद्रावती, श्रीमती वर्षाताई धानोरकर सामाजिक कार्यकर्ता भद्रावती, प्रफुल चटकी सामाजिक कार्यकर्ता भद्रावती यांनी उपस्थिती दर्शवली.
या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक महाकाल ग्रुप गडचांदूर यांनी पटकाविला, यांना १५,५५५ रु रोख रक्कम व ट्रॉफी व्यंकटेश बिल्डर्स व डेव्हलपर्स, भद्रावती मा. निलेश गुंडावार व मा. सुशील देवगडे यांच्याकडून देण्यात आले. दुसरा क्रमांक जे एम डी ग्रुप गडचंदुर यांनी पटकविला, यांना ११,१११ रु व ट्रॉफी मा. प्रणिता शेंडे व मा. आशालता सोनटक्के यांच्याकडून देण्यात आले.
तिसरा क्रमांक ए बी ग्रुप भद्रावती यांनी पटकविला, यांना ७,७७७ रु व ट्रॉफी AU investment, Stock Market भद्रावती वैभव उमाटे यांच्याकडून देण्यात आले.
याव्यतिरिक्त सोलो स्पर्धकांना SS मोबाईल भद्रावती, प्रतीक मोबाईल भद्रावती, मुंबई बाजार सेल भद्रावती, टच अँड जॉय भद्रावती, यांच्यातर्फे आकर्षण भेटवस्तू आणि ट्रॉफी देण्यात आले.
या कार्यक्रमाकरीता हेल्पिंग हँड्स NGO, भद्रावती गरबा दांडिया समिती, आणि समस्त मित्र परिवार व हितचिंतक यांनी आपले मोलाचे योगदान दिले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार करण्यास सहकार्य लाभले.
0 Comments