सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू

सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू

हिंदुस्थान न्यूज 24 : संजय लोहकरे 
उपजिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर 

बल्लारपूर: दिनांक 5.10.2025 ला सकाळी साप असल्याची माहिती मिळाल्याने सर्पमित्र म्हणून चांगली ओळख असलेला महेन्द्र भडके नावाचा तरुण साप पकडण्यासाठी पेपर मिल न्यु कालनी लगत असलेल्या नर्सरी येथे गेला. साप असलेल्या जागी पोहचून साप पकडत असतांनाच विषारी नाग जातीच्या सापाने महेन्द्र यांस दोन वेळा दंश केला. लगेच त्याला ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्याचा करूण अंत झाला. 
          महेन्द्र भडके ( वय 32 वर्षे ) विद्यानगर वार्ड, सावित्रीबाई फुले चौक, बल्लारपूर येथे राहत होता. आज पर्यंत कित्येक विषारी व बिनविषारी सापांना पकडून जंगलात सोडून त्यांना नवजीवन देणा-या महेन्द्र चा जीव एका सापाने घेतल्या मुळे संपूर्ण बल्लारपूरात व महेन्द्र याच्या मित्रपरिवारात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments