• स्थानिक गुन्हे शाखेची व पोलीस स्टेशन शेगाव ची संयुक्त कारवाई
ग्यानीवंत गेडाम - संपादक
७४१०७४४७७२
हिंदुस्तान न्यूज २४
वरोरा तालुक्यातील पोलीस स्टेशन शेगाव अंतर्गत मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार चारगाव बु. येथील राहणारा नितेश गौतम देठे वय 32 वर्ष राहणार चारगाव बुद्रुक हा त्याच्या राहत्या घरी गांजा आणून विक्री करणार आहे अशी खात्रीशीर माहिती सूत्राकडून मिळा ली असता त्या आधारावर शेगाव पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेंद्रसिंग यादव तसेच स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील कर्माचारी व शेगाव पोलीस कर्मचारी यांच्यासह नितेश गौतम देठे रा. चारगावं बु यांच्या घराची झडती घेतली असता दोन पिशव्यांमध्ये पॅक केलेले गांजाचे दोन पॅकेट मिळून आले. पोलीस अधिकारी यांनी तात्काळ पंचनामा करून कारवाई करीत 2 किलो मिळालेला गांजा जप्त करून वर नमूद आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. अ. क्रमांक 167/25 कलम 8(क), 20(ब) NDPS Act अन्वये गुन्हा नोंद करून सदर आरोपीला अटक करण्यात आली. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रपूर मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनात व उपविभागीय पोलीस अधिकारी चिमूर दिनकर ठोसरे यांचे प्रत्यक्ष उपस्थितीत सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेंद्रसिंह यादव ठाणेदार शेगाव पोलीस उपनिरीक्षक सुमित कांबळे, सहा. फौजदार बंडू मोहुर्ले व पो. ह. दिनेश ताटेवार, छगन जांबुडे पोलिस अंमलदार प्रफुल कांबळे, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर केकान ,चालक पोलीस अंमलदार रामेश्वर भिसे ,प्रगती भगत तसेच स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर पोउपनि सर्वेश बेलसरे, नितीन कुरेकर नितीन साळवे, प्रमोद कोटणाके, गजानन मळावी, अमोल सावे यांनी केली.
0 Comments