महाविकास आघाडीतर्फे आज बल्लारपूरात धरणे आंदोलन

महाविकास आघाडीतर्फे आज बल्लारपूरात धरणे आंदोलन 
हिंदुस्थान न्यूज 24: संजय लोहकरे 
उपजिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर 

बल्लारपूर: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी आणि चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटी कडून मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारने लागू केलेले 'महाराष्ट्र सार्वजनिक सुरक्षा विधेयक 2024' असंवैधानिक आणि लोकशाहीला हानिकारक आहे व लोकांच्या मुलभूत हक्कांचे उल्लंघन आहे. या करीता कांग्रेस पक्ष, शिवसेना ( युबिटी ), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एसपी) आणि सर्व कम्युनिस्ट पक्षांतर्फे बुधवार दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी बल्लारपूर नगर परिषद चौकात सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सार्वजनिक सुरक्षा विधेयका विरुद्ध निदर्शने करण्यात येणार आहेत.

महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष कांग्रेस पक्ष, शिवसेना ( युबिटी ), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एसपी) आणि सर्व कम्युनिस्ट पक्षाचे आघाडी व सर्व सेलच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या निदर्शनात सहभागी होण्याचे आवाहन देवेंद्र सत्यदेव आर्य अध्यक्ष बल्लारपूर शहर काँग्रेस कमेटी, प्रकाश पाठक तालुका प्रमुख शिवसेना आणि बादल उराडे यांचे द्वारा करण्यात आलेले आहे.

Post a Comment

0 Comments