उर्गेन संघरक्षित जन्मशताब्दी समारंभ कार्यक्रम संपन्न

उर्गेन संघरक्षित जन्मशताब्दी समारंभ कार्यक्रम संपन्न

हिंदुस्थान न्यूज 24 : संजय लोहकरे 
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर 

त्रिरत्न बौद्ध महासंघ बल्लारपुरच्या (केंद्र चंद्रपुर) वतीने शनिवार दिनांक 6 जून, 2025 ला दुपारी 1 वाजता भिक्षु निवास पाली विद्यालय  बुद्ध विहार, विद्यानगर, बल्लारपुर येथे त्रिरत्न बौद्ध महासंघाचे संस्थापक उर्गेन संघरक्षितजी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त *जन्मशताब्दी समारंभ* संपन्न झाला. कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणुन धम्मचारी लोकनाथ,नागपूर हे उपस्थित होते."*भंते उर्गेन संघरक्षित यांचे बौद्ध धम्म चळवळीतील योगदान*" या विषयावर त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. आदर्शाना वंदन करून सुरुवातीला धम्ममित्र विद्या भगत, निता कोरडे यांनी त्रिशरण पंचशील आणि पूजा घेतली. धम्ममित्र भास्कर भगत यांनी भंतेच्या जीवनकार्यावर सुंदर स्वलिखित गीत प्रस्तुत केले. पाहुण्यांच्या स्वागतानंतर धम्मचारी संघशिल यांनी प्रास्ताविक व परीचय करुन दिला. मंचावर धम्मचारी विवेकप्रभ उपस्थित होते. सूत्रसंचालन धम्ममित्र संपत कोरडे यांनी तर आभार प्रदर्शन धम्ममित्र संध्याताई गावंडे यांनी केले. धम्मपालन गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली. सदर कार्यक्रमात मोठ्या संख्येने धम्म बंधू आणि भगिनींची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments