" कवी नीरज आत्राम राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित "
हिंदुस्तान न्यूज 24: ग्यानीवंत गेडाम (उपसंपादक)
वरोरा: शिक्षक दिनाचे औचित्य साधून ज्ञान साधना बहुउद्देशिय शिक्षण विकास मंडळ चिखलगाव द्वारा आयोजित, ज्ञानसाधना कवितासंग्रहाचे प्रकाशन, पहिले विदर्भस्तरीय काव्य संमेलन, गुणवंत विद्यार्थी सत्कार व राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार २०२५ या कार्यक्रमाचे आयोजन शिक्षक दिनी म्हणजेच ५ सप्टेंबर २०२५ ला
वसंत जिनिंग हॉल,शेतकरी मंदिर मागे, वणी येथे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये कवी नीरज महादेव आत्राम, वरोरा यांना या वर्षीचा "राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार-२०२५ " संमेलनाध्यक्ष जेष्ठ कवी नागोराव कोम्पलवार,अतिथी ऍड.संतोष भादिकर, श्रीमती रजनी पोयम,राजेंद्र भादिकर, केशव तिराणिक, साधना भादिकर, भारती भादिकर यांचे शुभ हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला बहुसंख्या कवी,कवयित्री आणि श्रोतेगण यांची उपस्थिती लाभली होती. कवी नीरज महादेव आत्राम यांना राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार २०२५ ने सन्मानित केल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचेवर अभिनंदनाचे वर्षाव होत आहे.
0 Comments