हिंदुस्थान न्यूज 24 : संजय लोहकरे
उपजिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर
बल्लारपूर: शासनाच्या अन्न सुरक्षा कायद्यानुसार केशरी शिधापत्रिका धारकांना प्राधान्य कुटूंबामध्ये समाविष्ट करून नियमित धान्य पुरवठा होणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक लाभार्थ्यांना गेल्या काही महिन्यांपासून धान्य न मिळाल्याने नागरिकात तिव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप बल्लारपूर शहर तर्फे तहसिलदार रेणुका कोकाटे यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदन भाजप शहराध्यक्ष एड. धनंजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार दि. 9 सप्टेंबर 2025 ला देण्यात आले. शिष्टमंडळाने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की गेल्या आठ महिन्यांपासून नव्याने तयार झालेल्या केशरी शिधापत्रिका धारकांनाही अन्य धान्याचा लाभ मिळत नाही हे अन्यायकारक असून त्यांनाही तातडीने प्राधान्य कुटुंब योजनेचा लाभ देण्यात यावा. निवेदनात पुढे नमूद करण्यात आले की शासनाने लागू केलेल्या कायद्याचे पालन होत नसल्याने गरजू लाभार्थी वंचित राहत आहेत. शिधापत्रिका असूनही धान्य न मिळणे ही गंभीर बाब असून, प्रशासनाने तातडीने लक्ष घालून पुरवठा सुरू करावा, अशी मागणी प्रामुख्याने करण्यात आली आहे. या संदर्भात भाजप पदाधिकार्यांनी बल्लारपूर चे आमदार आणि माजी मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडेही साकडे घातले असून, त्यांनीही याकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा निवेदनकरत्यांनी व्यक्त केली आहे. शिष्टमंडळात बल्लारपूर शहर भाजपचे अध्यक्ष एड. रनंजय सिंह यांच्यासह शहर महासचिव घनश्याम बुरडकर, मिथीलेश खेंगर, ओमप्रकाश प्रसाद, अजय खोब्रागडे, विशंक ठाकूर, सुरेखा श्रीवास्तव, सर्वेश मिश्रा, जीतेन्द्र गुप्ता, गोलू सचदेव, राजेश शहा यांचे सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments