हिंदुस्थान 24 न्यूज : संजय लोहकरे
उपजिल्हा प्रतिनीधी,चंद्रपूर
बल्लारपूर : महसूल दिनाच्या 6 व्या दिवशी शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्काशीत करण्याबाबत निश्चित करण्यात आले असून त्यानुसार आज दि.6/8/2025 रोजी मौजा-कोठारी येथील अप्पर तहसीलदार यांचे कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरु असून इमारतीचे परिसरामध्ये काही निनावी व्यक्तींनी बेकायदेशीर नावाचा बोर्ड लावून शासकीय जमीनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. शासकीय जमिनीवर बेकायदेशीर केलेले अतिक्रमण निष्काशीत करण्याबाबत श्रीमती.रेणुका कोकाटे (शिंदे) तहसीलदार बल्लारपूर यांचे मार्गदर्शनाखाली नायब तहसिलदार मान. महेंद्र फुलझेले, अजय मलेलवर सहायक महसूल अधिकारी कु.निलम नगराळे, मंडळ अधिकारी सुजित चौधरी, ग्राम महसूल कर्मचारी अकोजवार, कोतवाल सुमित वाटगुळे वाहन चालक कचरु गेडाम या विशेष पथकाने मौजा-कोठारी व बल्लारपूर येथील चिंतामणी शारीरिक महाविद्यालय लगतच्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्काशीत करुन शासकीय जमीन ताब्यात घेण्याची धडक कारवाई केली.
0 Comments