• स्लाॅटर हाऊस कसाईखाना सुरू करण्याची परवानगी द्या
हिंदुस्तान न्यूज 24: शब्बीर सय्यद शब्बीर जागीरदार
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर
जिवती:-संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कुरेशी बांधवांनी आपला व्यवसाय बंद करून महाराष्ट्र राज्य बंद पुकारला आहे, गौरक्षकाच्या नावावर तथाकथित काही संघटना गाय बैल म्हैस व इतर जनावराचे धंदा करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या गाड्या अडवून त्या व्यापाऱ्यांना मारहाण करणे त्यांच्याकडचं माल जप्त करणे असे कारवाया महाराष्ट्रात सुरू असल्यामुळे त्या विरोधात महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी व्यापाऱ्यांनी, कुरेशी बांधवांनी महाराष्ट्र राज्यात बंद पुकारून निदर्शने, मोर्चे, सभा व निवेदनाच्या माध्यमातून मागण्या करत आहे. तहसीलदार जिवती, मुख्याधिकारी नगरपंचायत जिवती, यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आम्ही खालील व्यापारी आमच्या भागात पारंपारिक पद्धतीने चालणाऱ्या जनावरांच्या (महेस, रेडा ,शेळी,मेंढी) कत्तलीचे कार्य कायदेशीर चौकटीत आणण्यासाठी स्थानिक संस्थेच्या अधिकार प्राप्त क्षेत्रात कायदेशीर स्लॉटर हाऊस सुरू करण्यासाठी परवानगी मागत आहोत. महाराष्ट्र शासनाचे पशुसंवर्धन विभाग यांचे परिपत्रक क्रमांक:SLH-2013/C.R53/09-A, दिनांक 22 जुलै 2014 नुसार, ज्या गाव/शहरांमध्ये 7 किंवा त्यापेक्षा कमी जनावराची दररोज कत्तल होते, तेथे मॉडर्न स्लाॅटर हाऊस ची गरज नाही. अशा ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मंजुरीने पारंपारिक स्लॉटर हाऊस सुरू करणे शक्य आहे. तसेच, महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम 1965 व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार स्थानिक संस्थांना त्यांच्या क्षेत्रात जनतेच्या आरोग्य, स्वच्छता आणि जनावरांच्या कत्तलीसंदर्भात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आहे. अनेक वर्षापासून सदर कार्य बेकायदेशीर समजून अडथळे निर्माण होत आहेत. तरी, आम्ही निवेदना मार्फत नम्र विनंती करतो की, वस्तुस्थिती आणि शासन नियमांचा आधार घेऊन, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नियमानुसार एक छोट्या स्वरूपाचा कायदेशीर स्लॉटर हाऊस सुरू करण्यास परवानगी द्यावी जेणेकरून आरोग्य विषयक नियमांचे पालन करता येईल आणि व्यापाऱ्यांवर अन्याय होणार नाही. कृपया या संदर्भात लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा निवेदनातून अशी विनंती करण्यात येत आहे.निवेदन देतानी संघटनेचे अध्यक्ष उस्मान कुरेशी, उपाध्यक्ष जाफर कुरेशी, सचिव साबेर कुरेशी, सय्यद शब्बीर जागीरदार पत्रकार, अशपाक शेख माजी उपाध्यक्ष नगरपंचायत, हकानी शेख पत्रकार, मुनीर सय्यद सामाजिक कार्यकर्ता, सय्यद वजीर, मेहमूद कुरेशी, इस्माईल कुरेशी, तायर कुरेशी, मोहम्मद कुरेशी, इस्माईल कुरेशी, सलीम कुरेशी, अब्बास कुरेशी, रमजान कुरेशी, अन्वर कुरेशी, सलमान कुरेशी व इतर कुरेशी बांधव उपस्थित होते.
0 Comments