बहुजन समाज पार्टीची भद्रावती वरोरा विधानसभा बैठक संपन्न
हिंदुस्थान न्यूज 24: संजय लोहकरे
उपजिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर
चंद्रपूर : बहुजन समाज पार्टी भद्रावती वरोरा विधानसभेची चिंतन व समिक्षा बैठक सोमवार दिनांक 28/7/2025 ला दुपारी 4.00 वाजता PWD गेस्ट हाऊस वरोरा येथे संपन्न झाली. सदर बैठक महेन्द्र मकेश्वर यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. मकेश्वर हे आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात म्हणाले की येणाऱ्या सर्व जिल्हापरिषद, नगर परिषद, नगर पंचायत व ग्रामपंचायत च्या सर्व निवडणुका बसपा मोठ्या ताकदीने लढेल. कार्यकर्त्यांनी पुर्ण तैयारी ने या निवडणुकीत उतरावे अशी सर्व कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. प्रमुख मार्गदर्शक जिल्हा अध्यक्ष रत्नाकर साठे यांनी कार्यकर्त्यांना संघटना मजबूत करण्यासाठी सांगितले आणि सर्व विधानसभेत जिल्हा परिषदेच्या अनुसार विभाजन करण्याची जबाबदारी दिली. त्याचप्रमाणे मुख्य मार्गदर्शक व बल्लारपूर विधानसभा इन्चार्ज राजेश ब्राह्मणे यांनी सांगितले की कार्यकर्त्यांनी शासनकर्ती जमात बनण्यासाठी संघटनेला मजबूत करून निवडणूक लढली पाहिजे तेव्हाच सहजपणे यश प्राप्त होऊ शकते. जिल्हा प्रभारी व विधानसभा इन्चार्ज मा. धर्मेश निकोसे यांनी कार्यकर्त्यांमध्ये स्फुर्ति व जोश भरत जागोजागी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात यावे अशी विनंती केली. जिल्हा महासचिव मा. सुभाष पेटकर यांनी निवडणूकीच्या रणनितीवर मार्गदर्शन केले. या बैठकीचे प्रास्ताविक विधानसभा अध्यक्ष हरिदिंदू भारती यांनी केले. सुत्रसंचालन जिल्हा प्रभारी व विधानसभा इन्चार्ज मिलिंद शेंडे यांनी केले. आभार प्रदर्शन विधानसभा प्रभारी मा. रोशन नकबे यांनी केले. या बैठकीत भद्रावती वरोरा विधानसभेचे पदाधिकारी तथा भद्रावती शहर, मांजरी शहर, वरोरा शहर येथील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments