मेडिकल इक्विपमेंट बॅंकेचा चंद्रपूरात शुभारंभ
हिंदुस्थान न्यूज 24: संजय लोहकरे
चंद्रपूर:महाराष्ट्र राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवस 30 जुलै रोजी साजरा होतो. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यभर व जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.
आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवस जनसामान्यांच्या सेवेसाठी समर्पित उपक्रमांनी साजरा होतो. तो एक सामाजिक सोहळा ठरतो. आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि गरजूंच्या मदती सारख्या विविध क्षेत्रातील उपक्रमांच्या माध्यमातून राज्यभरात हा दिवस जनहितार्थ साजरा केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून सोमवार दिनांक 28 जुलै 2025 ला श्री कन्यका सोशल फाउंडेशन, चंद्रपूर यांच्या वतीने "मेडिकल इक्विपमेंट बॅंकेचा" शुभारंभ करण्यात आला. गरजू रुग्णांना आवश्यक वैद्यकीय उपकरणे सहज आणि सुलभपणे उपलब्ध व्हावीत या समाजोपयोगी हेतूने सुरू झालेला हा उपक्रम काळाची गरज ठरत आहे.
या उपक्रमाचा प्रारंभ आपल्या वाढदिवसाच्या औचित्याने झाल्याचा विशेष आनंद व्यक्त करत आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी श्री कन्यका सोशल फाउंडेशनच्या संपूर्ण सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छाही दिल्यात.
0 Comments