बल्लारपूर पेपर मिल कलामंदिर येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी
हिंदुस्थान न्यूज 24: संजय लोहकरे
उपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर
बल्लारपूर:- मागील 5 दशकांपासून पेपर मिल कलामंदिर बल्लारपूर च्या भव्य रंगमंचावर बुद्ध जयंतीला बुद्ध पौर्णिमा समारोह समिती तर्फे भव्य कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते. या वर्षी सुद्धा सोमवार दिनांक 12 में 2025 ला तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या 2569 व्या जयंती प्रित्यर्थ "बाबासाहेब कां जगले, कां रडले" या नाटकाचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी सायंकाळी 7 वाजता सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. पेपर मिल चे महाप्रबंधक उदयजी कुकडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून रितसर या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे महासचिव आकाशकांत दुर्गे यांनी केले. त्यानंतर मा. धम्मचारी आर्यानंद, त्रैलोक्य बौद्ध महासंघ, वर्धा यांनी 'तथागत भगवान गौतम बुद्धाची मुळतत्वे" या विषयावर आपले प्रवचन दिले.
त्यानंतर दरवर्षी प्रमाणे पेपर मिल मधून वयाची 60 वर्षे पूर्ण करून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येतो. हेमराज दुर्योधन या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा मंचावर सत्कार करण्यात आला.
तसेच बल्लारपूरातील काही शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सुद्धा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये पेपर मिल मध्ये ठेकेदारित काम करणारे महेंद्र सोरते यांची मुलगी डॉ समिक्षा हिने एम.बी.बी.एस. ही डॉक्टर ची पदवी मिळवली त्यामुळे तिचा समितीने सत्कार केला. योगेश रामटेके या मुलाने आय.आय.टी. मुंबई मधून इंजिनिअर ची पदवी प्राप्त केल्याने त्याचा सत्कार करण्यात आला. बल्लारपूरातील सामाजिक कार्यकर्ते आयु. पवन भगत यांनी लिहिलेल्या "ते पन्नास दिवस" या कोरोनाच्या काळात जी मजूरांची झालेली दयनीय दशा यावर लिहिलेल्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाने मुंबई विद्यापीठात एम. ए. च्या मराठी अभ्यासक्रमात समाविष्ट केल्याने पवन भगत यांचाही सत्कार करण्यात आला. मंगल जीवने हे वरिष्ठ पत्रकार आहेतच परंतु त्यांनी वयाच्या 70 व्या वर्षी एल. एल.बी. ही वकिलीची पदवी प्राप्त केली व आपल्या तीनही अपत्यांना उच्च शिक्षण देवून चांगल्या सरकारी नोकरी मध्ये लावून दील्यामुळे त्यांचाही सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाप्रसंगी मजदुर सभेचे कार्याध्यक्ष श्री तारा सिंहजी कलसी, मजदुर सभेचे महासचिव श्री वसंतजी मांढरे हे आवर्जून उपस्थित होते.
यानंतर उद्धव जांभूळकर लिखित, शितल विश्वंभर दोडके द्वारा दिग्दर्शित व इतर कलावंतांच्या द्वारे अभिनित "बाबासाहेब कां जगले कां रडले" या नाटकाची सुरुवात करण्यात आली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक अध्यक्ष विश्वास देशभ्रतार, महासचिव आकाशकांत दुर्गे, उपाध्यक्ष आनंद वाळके, सहसचिव निशांत सुटे, कोषाध्यक्ष मुकेश अलोने, संघटक निळकंठ पाटील, महेंद्र रामटेके, अनुज शेंडे तथा मंगलदिप हस्ते, पवन मेश्राम, अतूल शेंडे, रितेश बोरकर, विनायक देठे, सुमेध शेंडे, विकास पेटकर, विकास जयकर आदी समितीच्या कार्यकर्त्यांनी हा 2569 वा बुद्ध जयंतीचा कार्यक्रम उत्तम प्रकारे घडवून आणला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रिनिवास मासे यांनी केले. सदर कार्यक्रमाप्रसंगी बल्लारपूरातील जनतेने बहुसंख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेतला व नाटकाला ही चांगला प्रतिसाद दिला.
0 Comments