चाकूच्या धारेवर बल्लारपूरात धाडसी दरोडा
हिंदूस्थान न्युज 24:
संजय लोहकरे
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
बल्लारपूर:- वेकोली काॅलनी क्वार्टर नं. बी.4 मध्ये राहणारे वेकोलिचे उपव्यवस्थापक स्वामी हरला बानोत यांचे क्वार्टर मध्ये आज दिनांक 14.5.2025 ला पहाटे 3.30 वाजता अंधाराचा फायदा घेऊन या क्वार्टर च्या मागील भागात असलेल्या बाथरूम चे ग्रील तोडून दरोडेखोरांनी क्वार्टर मध्ये प्रवेश केला. बानोत कुटुंब गाढ झोपेत असताना चेहर्यावर मुखवटा व अंगावर काळे कपडे घातलेल्या 3 दरोडेखोरांनी मोबाईल च्या उजेडात बानोत यांचे गळ्याला सुरा लावत त्यांनी क्वार्टर मधून 7 तोळे सोने, मोबाईल, आवश्यक कागदपत्रे असलेली बॅग व बानोत यांचे कारची चावी सुद्धा लंपास केली.
ज्या वेळी हा दरोडा पडला तेव्हा क्वार्टर मध्ये बानोत यांचे व्यतिरिक्त त्यांची पत्नी ज्योती बानोत व दोन लहान बालके एवढेच कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. केवळ चौदा महिन्याच्या बालिकेच्या कानातून सोन्याची बारी हिसडून काढून घेतली. या नंतर हे सर्व दरोडेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.
बल्लारपूर पोलिस स्टेशन चे ठाणेदार श्याम गव्हाणे आपल्या पोलिस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. पोलिस उपनिरीक्षक विक्की लोखंडे यांनी प्राथमिक तपास केला. या संपूर्ण घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत भोयर हे करित आहेत.
0 Comments