शगुन लॉन परिसरात ऑनलाईन क्रिकेट सट्टा उघड : बल्लारपुरात दोघे अटकेत, मुख्य आरोपी फरार

शगुन लॉन परिसरात ऑनलाईन क्रिकेट सट्टा उघड : बल्लारपुरात दोघे अटकेत, मुख्य आरोपी फरार

Hindusthan news24 : रेखा चंडाले    
जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर 
 शहरातील शगुन लॉन परिसरात आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन सट्टा (बेटिंग) सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर बल्लारपूर पोलिसांनी कारवाई करत दोन जणांना ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार आहे.

ही कारवाई १२ एप्रिल रोजी करण्यात आली. फिरोज फारुख मोहम्मद ( ३३), रा. बालाजी वॉर्ड बल्लारपूर व सय्यद सिकंदर सय्यद हमजा (वय ३०), रा. राणी लक्ष्मी वॉर्ड बल्लारपूर असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस ठाणे बल्लारपूर येथील गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, शगुन लॉन परिसरात काही इसम मोबाईलद्वारे क्रिकेट सामन्यांवर पैशांची बाजी लावण्याचा जुगार खेळवीत आहेत.


 त्यानुसार पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकला.

या कारवाईत आरोपी फिरोज फारुख मोहम्मद (३३), रा. बालाजी वॉर्ड बल्लारपूर व सय्यद सिकंदर सय्यद हमजा (३०), रा. राणी लक्ष्मी वॉर्ड बल्लारपूर यांना ताब्यात घेण्यात आले. तर मुख्य आरोपी कार्तिक खामनकर (रा. राजुरा) हा आरोपी फरार असल्याचे सांगण्यात आले.

पोलिसांनी आरोपींकडून दोन मोबाईल फोन जप्त केले असून त्यामध्ये NICE७७७७.fun या वेबसाईटवर आयडी व पासवर्डच्या माध्यमातून ऑनलाईन क्रिकेट सट्टा सुरू असल्याचे आढळून आले. आरोपी लोकांना युजर आयडी व पासवर्ड देऊन मोबाईलवरून पैशांची बेटिंग लावण्यास प्रवृत्त करत होते, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.

सदर कारवाईत सुमारे ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिषेक जंगमवार, पोहवा सत्यवान कोटनाके, मोहन निषाद, पोअं खंडेराव माने व पथकांनी केले.

Post a Comment

0 Comments