आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पुरुष- महिला व्हॉलीबॉल संघाचा गौरव; किट व घड्याळांचे वाटप

 आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पुरुष- महिला व्हॉलीबॉल संघाचा गौरव; किट व घ


ड्याळांचे वाटप


 बल्लारपूर  : येथील क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करत आमदार सुधीर मुनगंटीवार  यांच्या हस्ते पुरुष व महिला व्हॉलीबॉल संघातील खेळाडूंना किट व घड्याळ देऊन गौरव करण्यात आला.


आमदार मुनगंटीवार यांच्या विशेष निधीतून उभारण्यात आलेल्या भव्य व्हॉलीबॉल मैदानावर चंद्रपूर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने नुकत्याच जिल्हास्तरीय ट्रायल्स पार पडल्या. या ट्रायल्समधून निवड झालेल्या खेळाडूंना आवश्यक किट उपलब्ध करून देण्याची संकल्पना असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद आहुते यांनी मांडली होती.


या उपक्रमाला मूर्त रूप देण्यासाठी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील बांधकाम, कामगार समितीचे सहअध्यक्ष तथा भाजपचे माजी शहराध्यक्ष डॉ. काशीनाथ सिंह यांनी पुढाकार घेत आमदार मुनगंटीवार यांच्याशी समन्वय साधला. त्यांच्या प्रयत्नांतून अल्पावधीतच खेळाडूंसाठी आकर्षक किट, जर्सी प्रिंटिंग व घड्याळांची व्यवस्था करण्यात आली.


आज आमदार मुनगंटीवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते पुरुष व महिला दोन्ही संघांना किट व घड्याळ प्रदान करण्यात आले. यावेळी त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक आशिर्वाद दिले. तसेच क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी पुढील काळातही सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमानंतर ते नागपूरकडे रवाना झाले.


या प्रसंगी चंद्रपूर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव सुनील आखाडे, राजीव चौधरी, विलास खांडरे, प्रकाश मसके आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्ष प्रमोद आहुते वैयक्तिक कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत.


किट व घड्याळ मिळाल्यानंतर खेळाडूंमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. या उपक्रमाबद्दल उपस्थितांनी आमदार मुनगंटीवार यांचे आभार मानले, तर डॉ. काशीनाथ सिंह यांच्या तत्परतेचे विशेष कौतुक करण्यात आले. त्यांच्या पुढाकारामुळे हा उपक्रम कमी वेळेत यशस्वीरीत्या पूर्ण झाला, अशी भावना व्यक्त करण्यात आली.

Post a Comment

0 Comments