गौतम नगर येथे आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
हिंदूस्थान न्युज 24: पुंडलिक येवले
तालुका प्रतिनिधी, भद्रावती
भद्रावती : शहरातील अशोका बुद्ध विहाराच्या पटांगणावर शिलभद्र मंडळ गौतम नगर तर्फे दि. १४ एप्रिल ला कार्यक्रमाचे अध्यक्ष, भारत खोब्रागडे, तहसीलदार, राजेश भांडारकर, मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी, नगराध्यक्ष, प्रफुल चटकी, बांधकाम सभापती, मंगेश सोनुलकर, नगरसेवक, महेश जिवतोडे आणि सौ. उषा जाधव यांच्या उपस्थितीत १३५ वी आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला निळा ध्वज प्रफुल चटकी यांच्या हस्ते फडकवण्यात आला. प्रज्ञा डांस ग्रुप तर्फे मा जिजाऊ, मा सावित्री मा रमाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यात आली.
शिलभद्र मंडळातर्फे तहसिलदार, राजेश भांडारकर, मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी, नगराध्यक्ष, प्रफुल चटकी, बांधकाम सभापती, मंगेश सोनुलकर, नगरसेवक, महेश जिवतोडे आणि सौ. उषा जाधव यांचे सन्मानचिन्ह तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
नगरपरिषद भद्रावती तर्फे मंचावरील सर्व उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते कार्यक्रमाला असणाऱ्या अनुयायांना भारतीय संविधान उद्देशिकेचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन सागर कांबळे, प्रास्ताविक अनिल बांबोडे, सत्कार सोहळ्याचे संचालन प्रवीण चिमूरकर, आभार प्रदर्शन सागर कांबळे यांनी केले.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शिलभद्र मंडळाचे अध्यक्ष भारत खोब्रागडे, सागर कांबळे, अनिल बांबोडे, प्रवीण चिमुरकर, जवादे, नानाजी रामटेके, शरद भावे, प्रशील कांबळे, पुनीत नगराळे आणि इतर सदस्यांनी अथक प्रयत्न केले.
0 Comments