#Varora •चिनोरा येथील प्रशासकाची नियुक्ती रद्द करण्याची प्रशासकीय समितीची मागणी • विकास कामे रखडल्याचा गंभीर आरोप

#Varora 
•चिनोरा येथील प्रशासकाची नियुक्ती रद्द करण्याची प्रशासकीय समितीची मागणी 

• विकास कामे रखडल्याचा गंभीर आरोप 

हिंदूस्थान न्युज 24: ग्यानिवंत गेडाम (संपादक)

वरोरा - तालुक्यातील ग्रामपंचायत चीनोरा येथील प्रशासकाच्या मनमानी कारभारामुळे गावातील विकास कामे रखडली असल्याचा गंभीर आरोप चिनोरा येथील प्रशासकीय समितीने केला आहे. यासंदर्भात लेखी तक्रार गटविकास अधिकारी पंचायत समिती वरोरा यांच्याकडे केली आहे.
ग्रामपंचायत चीनोरा येथे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत पेव्हर ब्लॅक आणि सिमेंट रोडचे काम मागील पाच महिन्यापूर्वीच पूर्ण झाले आहेत. ग्रामपंचायत ने या कामाची वर्क ऑर्डर दिली असून ग्रामसेवकांनी संबंधित फाईल वर साक्षरी केली आहे. परंतु या कामाचे काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देण्यासाठी प्रशासक जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. प्रशासकाच्या या वर्तणुकीमुळे गावाच्या विकास कामात अडथळा निर्माण होत असून ही बाब ग्राम विकासाच्या दृष्टीने घातक असल्याचे सदस्याचे म्हणणे आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याची बाब  यातून समोर येत असल्याने नागरिकात संताप व्यक्त होत आहे.
प्रशासकीय समितीने दिलेल्या निवेदनावर गट विकास अधिकारी पंचायत समिती वरोरा काय निर्णय घेतात? याकडे संपूर्ण चिनोरा ग्रामवासियाचे  लक्ष लागले आहे. या एकंदरीत प्रकरणावरून प्रशासकीय समिती आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments