मीथलेश चन्ने चा अवैध रेती वाहतुक करतांना हायवा महसूल विभागाचीनी केला जप्त;
८ ब्राससह हायवा व १० ब्रास रेतीचा ट्रक जप्त..!
हिंदूस्थान न्युज 24:पुंडलिक येवले
तालुका प्रतीनीधी, भद्रावती
भद्रावती : तालुक्यात अवैध रेती वाहतुकीविरोधात महसूल विभागाने धडक कारवाई करत डॉली पेट्रोल पंप परिसरात तसेच गुलमोहर पार्क, चिचोर्डी येथे दोन मोठी वाहने रंगेहात पकडली. या कारवाईत एक हायवा व एक ट्रक जप्त करण्यात आला असून त्यामध्ये अनुक्रमे ८ ब्रास व १० ब्रास रेती असल्याचे आढळून आले आहे.
महसूल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तहसील मंडळ अधिकारी समीर वाटेकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचला. चंद्रपूरवरून अवैध रेती घेऊन येणाऱ्या संशयित वाहनांवर लक्ष ठेवण्यात आले होते. पहाटे सुमारे ५ वाजता MH-34 CQ 6099 क्रमांकाचा हायवा ताब्यात घेण्यात आला. तपासणीदरम्यान संबंधित हायवामधून रेती उतरण्याचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले.
तसेच गुलमोहर पार्क, चिचोर्डी येथे हायवामधून सुमारे ८ ब्रास रेती खाली करण्यात येत असताना महसूल पथकाने अचानक छापा टाकला. संबंधितांकडे रेती वाहतुकीचा वैध परवाना विचारला असता तो उपलब्ध नसल्याचे आढळून आले. त्यामुळे हायवा ताब्यात घेऊन संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
तपासादरम्यान संबंधित हायवा हा चंद्रपूर येथील मीथलेश चन्ने यांच्या मालकीचा असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, याच दिवशी डॉली पेट्रोल पंप परिसरात आणखी एक ट्रक रेतीने भरलेला आढळून आला. सापळा रचून तोही जप्त करण्यात आला. सदर ट्रकमध्ये सुमारे १० ब्रास रेती असल्याचे निष्पन्न झाले असून तो नागपूर (उमरेड) येथील वहीद शेख यांच्या मालकीचा असल्याची माहिती मिळाली आहे.
सदर कारवाई R.I. समीर वाटेकर, ग्राम महसूल अधिकारी तलहार, ग्राम महसूल अधिकारी तळवेकर व त्यांच्या पथकाने संयुक्तरित्या नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली.
या कारवाईमुळे भद्रावती तालुक्यातील अवैध रेती वाहतुकीवर काही प्रमाणात आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, प्रशासनाकडून पुढील काळातही अशाच कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
0 Comments