वरोरा-ग्यानीवंत गेडाम
आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन वरोरा येथे शैक्षणिक अभ्यासक्रमा बरोबरच विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी नेहमीच विविध कार्यक्रमांचे आणि स्पर्धांचे आयोजन केले जाते. दीपावली या सणाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना कागदापासून बनवलेले आकाश कंदील तयार करण्यास उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पकतेने अतिशय सुंदर रंगीबेरंगी आकाशदिवे तयार करून आणले .या उपक्रमात १५० विद्यार्थ्यानी विविध रंग, आकार , साहित्य वापरून आकाशदिवे कलात्मकरित्या बनवून आणले. विद्यार्थ्याना आकाश दिवे तयार करण्यासाठी सांस्कृतिक विभागाच्या डॉ.दीप्ती चिटणीस व प्रा.किरण लांजेवार यांनी विशेष मेहनत घेतली.विशेष करून प्राचार्य डॉ. मृणाल काळे व उपप्राचार्य राधा सवाने यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर सहकारी यांचे उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य लाभले.
0 Comments