Varora• नीरज आत्राम यांना " आर्टिस्ट ऑफ द इयर अवार्ड " २०२५ जाहीर

#Varora

• नीरज आत्राम यांना " आर्टिस्ट ऑफ द इयर अवार्ड " २०२५ जाहीर 



वरोरा  :  अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, अमरावती,महाराष्ट्र यांच्या वतीने या वर्षी देण्यात येणारा "आर्टिस्ट ऑफ द इयर अवार्ड " २०२५ नीरज महादेव आत्राम आनंदवन, वरोरा जि.चंद्रपूर यांना जाहीर झाला आहे.कवी नीरज आत्राम हे गेल्या अनेक वर्षापासून शैक्षणिक,
सामाजिक,साहित्यिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी अनेक साहित्य संमेलने,कवी संमेलने यात महाराष्ट्रात आणि इतर राज्यात सहभाग नोंदविला आहे. त्यांना अनेक संस्थांनी या आधी पुरस्कार देऊन पुरस्कारीत केलेले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून समाजसेवेचे लोकोपयोगी कार्य सतत करीत आहे. या संस्थेच्या संस्थापिका सौ. माधुरी सचिन चव्हाण, अमरावती यांनी नीरज आत्राम यांना पुरस्कारासंबंधीत निवडपत्र पाठविले आहे.
कवी नीरज आत्राम यांची "आर्टिस्ट ऑफ द इयर अवार्ड " २०२५ करीता निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचे वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments