राजुरा - गडचांदूर मार्गावर भिषण अपघात, 6 प्रवाश्यांचा मृत्यू

राजुरा - गडचांदूर मार्गावर भिषण अपघात, 6 प्रवाश्यांचा मृत्यू 

हिंदुस्तान न्यूज 24: संजय लोहकरे 

       
राजुरा :  राजुरा - गडचांदूर मार्गावर गुरूवार  दिनांक 28.08.2025 ला दुपारी 4 वाजताचे दरम्यान कापनगांव जवळ हायवा ट्रकने विरूद्ध दिशेने येत असलेल्या आटोला जोरदार धडक दिल्याने भिषण अपघात घडून आला. आटोमध्ये ड्रायव्हर आणि 7 इतर प्रवासी होते. या धडकेत आटोमधील 3 व्यक्तींचा घटना स्थळीच मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच दोघांचा मृत्यू झाला तर एका जखमीचा राजुरा येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. एकावर राजुरा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. एका जखमी प्रवाशाची गंभीर अवस्था असल्याने चंद्रपूर येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. 
          या दुर्घटनेत रविंद्र हरी बोबडे,वय 48 राहणार पाचगाव, शंकर कारू पिपरे, वय 50 राहणार कोची, वर्षा बंडू मांदाळे,वय 41 राहणार खामोना, तनू सुभाष पिंपळकर, वय 18 राहणार पाचगाव, ताराबाई नानाजी पापुलवार, वय 60 राहणार पाचगाव, व आटोचालक प्रकाश मेश्राम, वय 50 राहणार पाचगाव या 6 प्रवाश्यांचा मृत्यू झाला असून निर्मला रावजी झाडे हिची प्रकृती गंभीर असल्याने हिला चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले तर भोजराज महादेव कोडापे, वय 40 राहणार भुरकुंडा यांच्यावर राजुरा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
         राजुरा पोलीसांनी घटनास्थळावरून जखमींना रुग्णालयात दाखल केले. पोलीसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. ट्रक चालक अद्याप फरार आहे. आमदार देवराव भोंगळे यांनी रूग्णालयाला भेट दिली व घटनेची माहिती घेतली. ठाणेदार सुमित परतेकी व त्यांचे पोलिस खात्यातील सहकारी पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments