• बल्लारपूरात महाबोधी महाविहार मुक्ती करिता जागृती रॅली
हिंदुस्तान न्यूज 24 : संजय लोहकरे
तालुका प्रतिनिधी, बल्लारपूर
बल्लारपूर:बिहार राज्यातील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे त्यांचा व्यवस्थापन समितीत असलेल्या गैर बौद्ध लोकांकडून पुर्णपणे बौद्ध अनुयायांच्या ताब्यात देण्यात यावे व बी.एम.टी.ऐक्ट 49 हा कायदा रद्द करण्यात यावा यासाठी मागील कित्येक वर्षापासून बुद्धगया येथे बौद्ध अनुयायांचे आंदोलन सुरू आहे. तसेच बौद्ध अनुयायांनी मोठ्या प्रमाणात आपले शक्ती प्रदर्शन म्हणून येत्या 12 मे 2025 बुद्ध पौर्णिमेला ला बुद्धगया येथे महाशांती मोर्चाचे आयोजन केले आहे. या शांती मोर्चात बाहेरील इतर अनेक देशातून सुद्धा बौद्ध अनुयायी उपस्थित राहणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाकारुणीक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या 2569 व्या जयंतीनिमित्त 12 में 2025 रोज सोमवार ला बल्लारपूर मध्ये सुद्धा महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाकरिता जागृती रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीची सुरुवात सकाळी 7 वाजता होणार आहे. ही रॅली बामणी येथून सुरू होऊन जूना बसस्टँड, बुद्ध नगर, संतोषीमाता वार्ड, वैशाली चौक, पाली बुद्ध विहार, जयभीम चौक, तथागत बुद्ध विहार मार्गे नवीन बसस्टँड कडून नगर परिषद सामोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ या रॅलीचे समापन होणार आहे.
0 Comments