अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिना निमित्त बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप.
हिंदुस्तान न्यूज 24:संजय लोहकरे
तालुका प्रतिनिधी, बल्लारपूर
बल्लारपूर : दि. 10 में 2025 ला
वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अँड. बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस दिनांक 10 में 2025 ला बल्लारपूर मध्ये अगदी साधेपणाने साजरा करण्यात आला.
अँड. बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आधीच सांगितले की 10 में 2025 ला जरी माझा वाढदिवस येत असला तरी कोणीही तो दिवस केक कापून किंवा फटाके फोडून साजरा करू नये. कारण भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये सध्या युद्ध सुरू आहे या युद्धाचे गांभीर्य लक्षात घेऊन माझ्या वाढदिवसाला महत्त्व देवू नये. त्याऐवजी पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीर आयोजित करावे आणि पाकिस्तान ला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांचे मनोबल वाढवण्यासाठी तिरंगा रॅली काढावी आणि भारत जिंदाबाद चे नारे द्यावेत.
एवढ्या स्पष्ट सूचना कार्यकर्त्यांना देवून सुद्धा कार्यकर्त्यांची अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रती अतिव श्रद्धा असल्याने कार्यकर्त्यांनी हा दिवस वंचित बहुजन आघाडी स्वाभिमान दीवस म्हणून अगदी साधेपणाने या वर्षी साजरा केला. अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे दुपारी 4 वाजता रुग्णालयातील फळं देऊन फळ वितरणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला.
0 Comments